पो.स्टे. अरोली हद्दीमधील निमखेडा येथील क्रिकेट सट्टयावर धाड

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई 

अरोली :-दिनांक ०८/०५/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन अरोली हद्दीत निमखेडा गावात वार्ड नं. ०३ येथे काही इसम हे एका घरात IPL मधील पंजाब विरूद्ध कलकत्ता यांचे मध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग (सड्डा) लावित असुन या प्रकारचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पथकास प्राप्त झाले वरून सदर पथकाने निमखेडा गावात वार्ड नं.. ०३ येथे सापळा रचुन छापा टाकून आरोपी नामे १) रुपेश लक्ष्मण धांडे, वय ३१ वर्ष, एलॉट नं. १३४, गोपालकृष्ण नगर, वाठोडा नागपूर हा आरोपी क्र. २) संतोष बागल, रा. वडसा गडचिरोली यांच्या सांगणेवरून लोकांकडुन पैसे घेवुन IPL मधील पंजाब विरूद्ध कलकत्ता यांचे मध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग (सट्टा) लावण्यावर रेड केली असता आरोपी रुपेश लक्ष्मण धांडे, वय ३१ वर्ष, प्लॉट नं. १३४, गोपालकृष्ण नगर, वाठोडा नागपूर हा क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असतांना समक्ष मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातून १) ४ मोबाईल संच किंमती अंदाजे २२,०००/- रुपये २) एक TV २०००/- रुपये ३) नगदी ५०००/- रुपये असा एकूण २९,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींतांना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे अरोली यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली परी पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के, परी पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार राजेंद्र रेवतकर, पोलीस नायक आशीष मुंगळे, किशोर वानखेडे, उमेश फुलवेल, सतिश राठोड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com