डीईआयसी येथे ‘बालकांच्या डोळ्यांचे आजार’ तपासणी शिबीर संपन्न

गडचिरोली :- जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके/विध्यार्थी यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, थेरेपी, उपचार, त्याचप्रमाणे उच्च स्तरीय बाल विशेषज्ञ सल्ला/सेवा, गरजेनुसार उच्च स्तरीय चाचणी/तपासणी व शस्त्रक्रिया करिता तृतीय स्तरीय संदर्भ सेवा इत्यादींकरिता राज्यशासनाच्या मार्गदर्शकानुसार “द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष” म्हणून बालआरोग्य विभाग “डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर” (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित आहे.

सदर डीईआयसीयेथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच इतर तालुक्याच्या ठिकाणाहून प्राथमिक तपासणी दरम्यान आढळून आलेले बालके/विद्यार्थी ज्यांना पुढील तपासणी, निदान निश्चिती, त्याचप्रमाणे उच्च स्तरीय बाल विशेषज्ञ सल्ला/सेवा, उच्चस्तरीयउपचार, अश्या द्वितीय स्तरीय सेवांची गरज असते अश्या बालकांची डीईआयसी (द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष) येथे नोंदणी केली जाते. डोळ्याचे आजार असलेल्या बालकांच्या डोळ्याचे निदान निश्चिती साठी बाल नेत्र विशेषज्ञ सल्ला आवश्यक असणाऱ्या बालकांकरिता दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘विशेषज्ञ बाल डोळे तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये साराक्षी नेत्रालय नागपूर येथील उच्च स्तरीय बाल नेत्र विशेषज्ञ चमू उपस्थित झाली.

शिबिर मध्ये जिल्ह्यातील एकूण ९४ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यांचा पालकांना डोळ्यांच्या आजाराबाबत, शस्त्रक्रियेबाबत समुपदेशन, मार्गदर्शन करण्यात आले. यापैकी ज्या बालकांना शस्त्रक्रियेची गरज आहे या बालकांच्या विशेष चाचण्या करून शस्त्रक्रियेकरिता पात्र बालकांना तृतीय स्तरावर संदर्भित करण्याचे नियोजन होणार असून काही नवजात बालकांना शिघ्र हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याने लवकरात लवकर या चिमुकल्यांना शस्त्रक्रियेकरिता उच्चस्तरावर संदर्भित करण्याचे नियोजन झालेले आहे.

या सर्व सेवा निशुल्क आणि मोफत तसेच बाहेरील तज्ञ जिल्ह्यातच उपलब्ध झाल्याने बालकांचे पालक समाधानी आहेत.

लहान बालकांच्या डोळ्यासंदर्भात, दृष्टीसंदर्भात वेळीच आणि लवकर हस्तक्षेप करणे गरजेच आहे. तसे न केल्यास मूल्यांच्या वाढीच्या टप्प्यावर परिणाम होण्याचे संकेत असते. व भविष्यात मोठ्या संकटांना समोर जाव लागू शकतो.

सदर ‘विशेषज्ञ बाल डोळे तपासणी शिबीर’ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके, डॉ.धुर्वे सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.आखाडे जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या नियोजनाखाली पार पडले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता डीईआयसीतील अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ.माधुरी किलनाके यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इस्कॉन नागपुर ने बंगलादेश के भक्तों एवं अल्पसंख्यकों की सुरक्षा के लिए किया महा संकीर्तन।

Mon Dec 2 , 2024
– लोकनाथ स्वामी महाराज के निर्देशन से हुआ कार्यक्रम नागपूर :- अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) के नागपुर केंद श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर के प्रांगण में इस्कॉन संस्थापकाचार्य ए सी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद के प्रिय शिष्य श्रील लोकनाथ स्वामी महाराज एवं इस्कॉन नागपुर के अध्यक्ष सच्चिदानंद प्रभु के निर्देशन में बंगलादेश के हिंदुओं, खास तौर पर इस्कॉन के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!