नागपूर :-जनतेसाठी काम करणारे मुख्यमंत्री बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी तर्फे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस अतिशय आनंदात साजरा.
राज्याच्या सर्वांगिन विकासासाठी आवश्यक असणारे व्हिजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून तळागाळातील जनतेसाठी काम करताना त्यांनी नेहमी संवेदनशीलता जपली आहे. प्रत्येकाला आपलेसे वाटणाऱ्या नेत्याचा वाढदिवस आज संपूर्ण नागपूर शहरात साजरा करण्यात आला. जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. जागनाथ बुधवारी येथील शिवसेना कार्यालया समोर श्री हनुमान मंदिर येथे सुरज गोजे (जिल्हाप्रमुख) यांच्या हस्ते पुजन व महाआरती करून समस्त पदाधिकारी व शिवसैनिकांनी हनुमान चालीसा पठन व महाप्रसाद वाटप कार्यक्रम करण्यात आला. नागपूर जिल्हा संघटिका मनीषा पापडकर व शहर प्रमुख अनिता जाधव, महिला आघाडी तर्फे सोमवारी क्वार्टर येथील गांधी विद्या मंदिरामध्ये लहान बालकांना शालेय सामग्री, चॉकलेट आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हा संघटक मोरेश्वर कटारमलांनी बालाजी नगर हनुमान मंदिरात ज्येष्ठ नागरिकांना लाडूवाटप मेडिकल हॉस्पिटल येथे शहर प्रमुख समीर शिंदे तर्फे बाल रुग्णालयामध्ये फळ वाटप व पेशंटच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे वाटप, डागा हॉस्पिटल येथे जिल्हाप्रमुख युवा सेनेचे निलेश टिकलेकर यांनी बाल रुग्णालयात फळ व मिठाई वाटप जागनाथ बुधवारी येथील टीबी दवाखान्या जवळ ओसीडब्ल्यू परिसरातील स्थानिक महिला पदाधिकारी मध्य नागपूर संघटिका नलिनीताई बोकडे यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख सुरज गोजे नागपूर जिल्हा संघटिका मनिषा पापडकर, जिल्हा संघटक मोरेश्वर कटारमल, नागपूर शहर प्रमुख अनिता जाधव, शहर प्रमुख परसराम बोकडे, संपर्कप्रमुख गुलाम पोठियावाला, शहर प्रमुख धीरज फंदी, शहर प्रमुख समीर शिंदे, मध्य नागपूर संघटिका नलिनी बोकडे, दक्षिण संघटिका मंजुषा पानबुडे, दक्षिण प्रमुख नैना दीक्षित, दक्षिण प्रमुख अर्चना कडू, पुनम चाडगे, लक्ष्मी सातपुते, कविता विश्वकर्मा, रूपाली बोकडे, राजश्री इंगळे, स्मिता पेरकर, शिल्पा थोटे, श्वेता कोठेकर निलेश तिघरे, केतन रेवतकर, सागर मौंदेकर, धीरज काटे, जयंता कोकाटे, देवेंद्र माहुरकर, चिंतामण पारशिवनीकर, प्रवीण अभंगे, राजेश बिनेकर, उत्तम रंभाड, हरिष पाठराबे प्रामुख्याने उपस्थित होते.