संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन पासुन अवघ्या अर्ध्या किमी वर नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील स्वामी विवेकानंद नगर येथील घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे साहित्य व नकदी असे एकुण २८,००० रुपयाचा मुद्देमाल चोरी केल्याने कन्हान पोस्टे ला महिलेच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंदयाना सुगीचे दिवस आल्याने चोरी करणारे आरोपी पकड ण्यास कन्हान पोलीस अपयशी ठरत असल्याने घर फोडी, वाहन चोरी व इतर चो-याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथ कास कन्हान च्या चोरी व इतर गुन्हयातील आरोपी पकडतात. कन्हान पोस्टे अंतर्गत बहुतेक गुन्हयाचा योग्य निवाडा लागत नसल्याने कन्हान थानेदार विला स काळे यांच्या कार्य प्रणाली विषयी नागरिकात उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे.शनिवार (दि.१६) जुलै ला सकाळी १० वाजता गं.भा. प्रतिभा महेंद्र चौरे वय ४९ वर्ष राह.
नागपुर जबलपुर महामार्ग लगत स्वामी विवेकानंद नगर कन्हान या घराला कुलुप लावुन सेवाग्राम वर्धा येथे कार्यक्रमा ला गेल्या असता मंगळवार (दि.१९) ला प्रतिभा चौरे यांना किरायदार रहीम शेख यांनी फोन करून तुमचा घराचा दरवाजा खुला दिसुन चोरी झाली असल्याचे सांगितल्याने त्या वर्धेवरून येऊन पाहीले तर हाॅलच्या रूम ला लावलेला लाॅक सुद्धा तुटलेला दिसले, लोखंडी आलमारीची पाहणी केली असता लाॅकर मध्ये एका पर्स मध्ये ठेवलेली सोन्याची अंगुठी ५ ग्रँम, सोन्याचे लाॅकेट २.३४० मीली ग्रँम, १ सोन्याचा मणी असे एकु ण २०,००० रूपयाचा तसेच लाॅकर मध्ये स्टील च्या डब्यातील नगदी ८,००० रूपये दिसले नाही. शनिवार (दि.१६) जुलै सकाळी १० ते मंगळवार (दि.१९) ला दुपारी १२ वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यां नी घराचे समोरील लाॅक तोडुन आत प्रवेश करित लोखंडी आलमारीतील नगदी रूपये व सोन्याचे दागिने असा एकुण २८,००० रूपयांचा मुद्देमाल चोरी केल्याने कन्हान पोस्टेला फिर्यादी गं.भा. प्रतिभा चौरे च्या तोंडी तक्रारीने अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ४२८/२२ कलम ४५४, ४५७, ३६० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आरोपीचा शोध घेत आहे.