मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सामाजिक न्याय दिन, विविध उपक्रमांना दिल्या शुभेच्छा 

मुंबई, दि. २7 :-  सामाजिक समतेचे अग्रदूत, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. या जयंती निमित्त साजरा करण्यात येत असलेला “सामाजिक न्याय दिन” व त्यातील सर्व उपक्रमांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री  ठाकरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, राजर्षी शाहूंनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक समतेसाठी खर्ची घातले. स्त्रीशिक्षण, वंचिताचे शिक्षण आणि त्यांचे न्याय्य हक्क यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांनी लोककल्याणकारी अशा अनेक योजना, प्रकल्पांचा पाया घातला. शेती-सिंचन, उद्योग- व्यापार, सहकार या क्षेत्रांना जाणीवपूर्वक चालना दिली. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या या निर्णय – धोरणांचा बहुमोल असा वाटा आहे. राजर्षी शाहूंनी आपल्याला अशा अनेक गोष्टींचा धडा घालून दिला आहे. त्यांची उजळणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यातून आणखी समृद्ध, वैभवशाली महाराष्ट्र उभा करण्यासाठी कटिबद्ध राहुया, हेच राजर्षी शाहूंना अभिवादन. जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आंनद बुद्ध विहारात ध्यान साधना साठी मॅट वितरण

Mon Jun 27 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी प्रतिनिधी 27 जुन –  नवी कामठी भागातील आनंद नगरात राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती कार्यक्रम रविवार 26 जुन ला आयोजित करण्यात आला,प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या छायाचित्राला माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले हेमलताताई पाटील यांनी मार्गदर्शन केले आमदार टेकचंद सावरकर यांनी प्रदान केलेल्या मॅट ध्यान साधना आणि योग करिता आनंद बुद्ध विहारला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!