बसपा ने महात्मा फुले जयंती साजरी केली 

नागपूर :- सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वी जयंती आज बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने कॉटन मार्केट चौकातील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी एड सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, रंजना ढोरे, उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण व अभिवादन करून साजरी करण्यात आली.

महात्मा फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष  मायावती यांच्या नेतृत्वात बसपा ने आपला तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय दर्जा कायम ठेवल्याबद्दल फुले-शाहू- आंबेडकर व कांशीराम यांच्या विचारांच्या मायावती चे याप्रसंगी बसपा नेते उत्तम शेवडे यांनी जाहीर अभिनंदन केले.

फुलेंच्या जन्मदिनाची भेट म्हणून बहुजन समाजाने फुलेंच्या भाषेतील शेठजी (काँग्रेस), भटजी (भाजपा) चे पक्ष नाकारून बहुजन समाजाच्या बसपाला स्वीकारावे असे याप्रसंगी बसपा नेत्यांनी जाहीर आवाहन करून, महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन तसेच त्यांच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान करावा असेही आवाहन केले.

बसपाच्या कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत झालेल्या जयंती समारोह प्रसंगी प्रामुख्याने बसपाचे जिल्हा प्रभारी प्रा सुनील कोचे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, उमेश मेश्राम, जिल्हा महिला आघाडीच्या सुरेखा डोंगरे, शहर प्रभारी विकास नारायने, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेविका वैशाली नारनवरे, माजी शहराध्यक्ष महेश सहारे, राजू चांदेकर, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, चंद्रशेखर कांबळे, एड अतुल पाटील, दक्षिण नागपूरचे जितेंद्र पाटील, मध्य नागपूरचे प्रवीण पाटील, एड वीरेश वरखेडे, एड आकाश खोब्रागडे, योगेश लांजेवार, नितीन वंजारी, सुरेंद्र डोंगरे, प्रकाश फुले, सुभाष नेत्राम, ओमप्रकाश शेवाळे, तपेश पाटील, विशाल बनसोड, विलास मून, सदानंद जामगडे, बुद्धम राऊत, अशोक रंगारी, वीरेंद्र कापसे, ओंकार अंबादे, धनराज हाडके, जनार्धन मेंढे, विनोद मेश्राम, भानुदास ढोरे, सिद्धार्थ फोपरे, अंकेश सहारे, हिरालाल सोनवले, सौम्य खान, सुबोध साखरे, अनिल मेश्राम आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाव्दारे कारवाई

Wed Apr 12 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.11) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत हिल रोड, रामनगर चौक येथील स्नेहल कॅर्ट्रस यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com