चैन स्नॅचिंग व दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात

नागपुर – चैन स्नॅचिंग व दुचाकी चोरी करणारा सराईत चोरट्याला बेड्या ठोकण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रं 04  पोलिसांना यश आले आहे. दि 24.06.22 चे  10ः35 वा चे दरम्यान फिर्यादी नंदा चंद्रशेखर गुमगावकर वय 45 वर्ष रा. अंबानगर वृदावन लॉन, नागपुर ह्या आपल्या मदरडअेरी नावाच्या दुकानात हजर असतांना, अनोळखी आरोपी इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यााात असलेल्या हारावर हाताने झटका मारून, सोन्याचे अर्धवट हार हे जबरीने हिसकावुन नेला. अश्या तक्रारीवरून पो.स्टे. अजनी, कलम 392 भादवी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयातील आरोपीचे समांतर शोधात असतांना युनिट क्र. 4, गुन्हे शाखा, यांनी तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदाराचे माहीती वरुन रामटेके नगर टोली रोड येथे आरोपीचा शोध घेत असतांना. एक इसम समोर MH.49.Z6128 व मागे नंबर प्लेट नसलेल्या अॅक्टीव्हाने जात असलेला दिसुन आला. त्यास थांबवुन ताब्यात घेतले. त्याने त्याचे नांव आकाश राजेंद्र गुडदे, वय 30 वर्ष रा. 405, कटपुतली कॉलोनी पांडवनगर, नवि दिल्ली. ह.मु. रामेश्वरी रिंग रोड, शताब्दीनगर, प्लॉट नं. 25, चर्च जवळ, पो.स्टे. अजनी. असे सांगीतले. सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केल्याने व  याचे कडे विक्री करण्या करीता देवुन आलेले पैसे तीन्ही आरोपी आपसात वाटुन घेण्याचा बेत असल्याचे सांगीतले.
तसेच त्याने सदर गुन्हयात वापरलेले वाहन हे 8 ते 9 दिवसापुर्वी सुयोगनगर गार्डन जवळुन चोरी केल्याचे ही सांगीतले त्याबाबत पो.स्टे. अजनी येथे अप.क्र.397/2022 कलम 379 भादवी. चा दाखल असल्याने सदर वाहन ताब्यात घेण्यात आले. अशाप्रकारे पो.स्टे. अजनी येथे दाखल अप.क्र. 408/2022 कलम 392 भादवी. चा गुन्हा अवघ्या काही तासात उडकीस आणुन गुन्हयात जबरीने हिसकावुन नेलेला मुद्देमाल व गुन्हयात वापरलेले व पो.स्टे. अजनी येथे दाखल अप.क्र..397/2022 कलम 379 भादवी चे गुन्हयातील अॅक्टीव्हा वाहन असा एकुण 39,000/रु. चा मुद्देमाल आरोपी क्रं. 1) आकाश राजेंद्र गुडदे, वय 30 वर्शे रा. 405, कटपुतली कॉलोनी पांडवनगर, नवी दिल्ली. ह.मु. रामेश्वरी रिंग रोड, शताब्दीनगर, प्लॉट नं. 25, चर्च जवळ, 2) दिनेश पन्नालाल मानकर, वय 38 रा. रामेश्वरीरी रिंग रोड, शताब्दीनगर, 3) सुरेंद्र अजाबराव थोरात, वय 27, रा. रा. 648, कटपुतली कॉलोनी पांडवनगर, नवी दिल्ली. ह.मु. रामेश्वरी रिंग रोड, शताब्दीनगर, प्लॉट नं. 25, चर्च जवळ हस्तगत करण्यात येवुन तीन्ही आरोपींना पो.स्टे. अजनी येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी नागपुर शहराचे  पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) चिन्मय पंडीत , सहाय्यक पोलीस आयुक्त (डिटेक्शन) रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  गणेश जामदार, सपोनि ओमप्रकाश सोनटक्के, सपोनि  निलेश वाघमारे, जितेंद्र ठाकुर, म.पोउपनि. निरंजना उमाळे, पोहवा, सुनील ठवकर, रविंद्र पानबुडे, बबन राऊत, नापोअं सतिश  ठाकरे, निलेश ढोणे, बजरंग, सचिन तुमसरे, युवानंद, पोअं स्वप्नील अमृतकर, विलास, संदीप मावलकर, महेश काटवले, श्रीकांत मारवाडे, पुरुषोत्तम यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ

Tue Jun 28 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने मतदार चक्रावले -कामठी नगर परिषद कडे तक्रारींचा पाऊस कामठी ता प्र 28 :-आगामी काळात होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद च्या पाश्वरभूमीवर लागू असलेल्या निवडणूक कार्यक्रमातील प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा सावळा गोंधळ झाला असून या सावळा गोंधळात शहरातील मतदारासह माजी नगरसेवकगणसह भावी नगरसेवकगण चक्रावले आहेत.त्यामुळे आक्षेप नोंदविण्याच्या अखेरच्या 27 जून या तारखेपर्यंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!