श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा रविवारी

– श्रीगणेश याग आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन

नागपूर :- श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने हिंगणा तालुक्यातील झिल्पी तलाव मोहगाव येथे दोन वर्षांपूर्वी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराची स्थापना करण्यात आली. आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या दोन वर्ष पूर्तीनिमित्ताने रविवारी 11 फेब्रुवारी रोजी द्वितीय वर्धापन दिनाचा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये हिंगणा तालुक्यातील मोहगाव येथील झिल्पी तलावाच्या काठावर निसर्गरम्य परिसरात श्री सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या स्थापना दिनाच्या अनुषंगाने रविवारी (ता.11) मंदिरात सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत श्रीगणेश याग होणार आहे. यानंतर सकाळी 11.30 ते दुपारी 2 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्रीगणेश याग आणि भव्य महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी महापौर, मा. उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव आणि श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बीएसएनएल नागपूर क्षेत्रद्वारे 20 व्या अखिल भारतीय बीएसएनएल कॅरम आणि कल्चरल टूर्नामेंटचे 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान आयोजन

Sat Feb 10 , 2024
नागपूर :- केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अधीन सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड-बीएसएनएलच्या नागपूर कार्यालयाद्वारे येत्या 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान 20व्या अखिल भारतीय बीएसएनएल कॅरम आणि कल्चरल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून 12 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी 10 वाजता आमदार निवास परिसरात बीएसएनएलच्या महाराष्ट्र दूरसंचार परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांच्या हस्ते होणार असून सन्माननीय अतिथी म्हणून कोअर नेटवर्क […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com