नागपूर :- फिर्यादी प्रितेश अर्जुनदास नागोसे वय ३८ वर्ष रा. प्लॉट नं. १६१, दत्तनगर, कळमण्णा, नागपूर हे मित्रांसह जेवन करून एकटे त्यांचे मोपेड क. एम.एच ४९ ५१५० ने परी जात असता, पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत कामठी ओव्हर ब्रिज नंतर कळमणा रोडवरील डावे बाजुला असलेल्या झाडी झूडपामध्ये लघुशंके करीता थांबले असता, दोन अनोळखी ईसमांनी तेथे येवुन फिर्यादीस येथुन महिला येणे-जाणे करतात तू येथे का थांबला असे म्हटले असता फिर्यादीने त्यांना माफी मागीतली, दोन्ही आरोपींनी फिर्यादीस धक्का-बुक्की करून फिर्यादीचे खिश्यातील रेडमी कंपनीचा मोबाईल व फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन असा एकुण १,४५,०००/- रू. चा मुद्देमाल जबरीने हिसकावुन मोटरसायकलने पळुन गेले. फिर्यादी यांचे तक्रारीवरून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे नविन कामठी येथे कलम ३०९(४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी त्वरीत दखल घेवुन तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी नामे मोहसीन रजा उर्फ गोलू गुलाम रजा वय ३६ वर्ष रा. पेरखेडा, ग्रामपंचायत जवळ, नविन कामठी, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली, त्याचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले वाहन हिरो हंक मोटरसायकल क. एम.एच ३२ ई ७९४५ किंमती ८०,०००/- रू. चे जप्त करण्यात आलेले आहे. पाहिजे आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीस पुढील कारवाईस्तव नविन कामठी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविंद्र सिंघल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पो. आयुक्त, नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा, पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा युनिट क. ५ वे पोनि, राहुल शिरे व त्यांचे पथकतील अंमलदार यांनी केली.