संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जील्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरावर तिसऱ्या डोळ्यांची नजर राहावी यासाठी शहरातील मुख्य रसत्यासह नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील 38 पॉईंट वर 158 ठिकाणी तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील काही पॉईंट वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील हालचालीवर नजर ठेवने शक्य होते तसेच कित्येक गुन्हेगारीच्या घटना ह्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून उघडकीस आल्या आहेत.मात्र मागील काही वर्षांपासून प्रगती पथावर असलेल्या मेट्रोच्या कामामुळे मागील सहा महिन्यांपासून कामठी शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून शोपीस ठरले आहेत तर आजही कामठी शहरातील कित्येक मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या जागेत अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही ही एक शोकांतीकाच म्हणावी लागेल ज्याचे प्रात्यक्षिक उदाहरण कामठी च्या बस स्थानक चौकातुन दिसुन येतो. तेव्हा आगामी विधांनसभा निवडणुका व शहराची संवेदनशील स्थिती बघता कामठी च्या बंद असलेले सिसिटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
मेट्रो च्या नावाखाली कामठी शहरातील सिसिटीव्ही कॅमेरे सध्या कार्यरत नाही हे कॅमेरे लावण्यासाठी प्रशासनातर्फे लाखो रुपयांचा निधी खर्च केला त्या कॅमेऱ्याची देखभाल दुरुस्तीसह कमेरा नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला यातून शहरावर तिसऱ्या डोळ्यातुन लक्ष ठेवणे सुरू झाले होते व पोलीस प्रशासनाला आरोपीचा शोध घेण्यास मोलाची मदत होऊ लागली होती परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षितांमुळे देखभाल दुरुस्ती अभावी हे कॅमेरे चालेनासे झाले आहेत. पण आता या कमेऱ्याचा उपयोग होताना दिसत नाही.
कामठी बस स्थानक चौकात यापूर्वी स्वास्थ्य कर्मचारी कमल बढेल तसेच कांग्रेस चे पदाधिकारी तुषार दावानी याच्यावर सामुहिक प्राणघातक हल्ला झालेला आहे तसेच बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसर रहिवासी कुंदन रंगारी नामक तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला तसेच या परिसरात दुचाकी चोरी, लुबाडनुक , किरकोळ मारझोड यासारख्या बहुधा घटना घडल्या आहेत तेव्हा या परिसराची संवेदनशीलता तसेच निवडणुका लक्षात घेता कुणी निर्दोष अनुचित घटनेला बळी न पडावे यासाठो कामठी बस स्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी जोर धरत असली तरी पोलीस विभाग यावर मौन भूमिका घेऊन बसली आहे ज्याचे आश्चर्यच वाटते.शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पाश्वरभूमीवर कामठी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सूरु होऊन योग्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यास गुन्हेगारांना व अवैध धंदे कणाऱ्यांना वठणीवर आणण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश येईल तसेंच शहरात होणाऱ्या घरफोड्या,हाणामाऱ्या, चौकात होणारी छोटी मोठी भांडणे, अवैध धंदे,महिला व युवतीच्या छेडछाडीच्या अशा अनेक गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा समजला जाणारा सीसीटीव्ही कॅमेराच विघ्नहर्ता ठरू शकतो.