नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (21) रोजी शोध पथकाने 133 प्रकरणांची नोंद करून 70000 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

नागपूर :- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून एकलव्य निवासी शाळेत प्रवेश दिला जातो. शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानूसार यावर्षी विभागांतर्गत 10 एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. या निवासी शाळेत इयत्ता सहावीमध्ये नियमित प्रवेश घेण्यासाठी आणि इयत्ता सातवी ते नववी वर्गातील अनुसूचित जमातीच्या रिक्त जागांवर […]

नागपूर :- राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागाकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशिल शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पाकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्याची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या उत्पादनात भर पडेल हा […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.21) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग न.31, एस.डी.हॉस्पीटल जवळ, गणेश नगर येथील अरमान बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच गांधीबाग झोन […]

लव्ह जिहाद विरोधी कायदा करणार; धर्मांतर समस्येविषयी सरकार गंभीर : मुख्यमंत्री – भगवेमय झाले नागपूर – महिला-युवतींचा विशेष सहभाग नागपूर :- लव्ह जिहादच्या विरोधात महाराष्ट्र शासन निश्चिपणे कायदा करणार आहे, तसेच धर्मांतर समस्येविषयी शासन गंभीर आहे, असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’च्या शिष्टमंडळाला विधानभवनात दिले. या शिष्टमंडळात बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार भरतशेठ गोगावले, […]

आज राज ठकरे शहरात :  मनसेच्या कार्यकर्त्यांचा सवाल नागपूर, ता. २२ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उद्या शुक्रवारी (ता.२३) नागपूर येत असून ते खंडणीखोर नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे काय कारवाई करतात याकडे सर्व सैनिकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्यासमक्ष खंडणीचा विषय कोणी काढू नये याची खबरदारी विदर्भातील एक बडा आणि दुरुगकरचा पाठिराखा असलेल्या एक […]

भंडारा : केंद्र पुरस्कृत “आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME)” ही योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षासाठी लागू केली आहे. या योजनेमध्ये कृषि उत्पादने, दुग्ध व पशुउत्पादने, मांसउत्पादने, वन उत्पादने इत्यादीवर प्रक्रिया करणे व यांवर आधारित उत्पादने याचा समावेश आहे. वाया जाणाऱ्या कच्च्या शेतमालाचे प्रमाण कमी करणे, उत्पादनाची योग्य पारख करणे, उत्पादनाची साठवणूक, प्रक्रिया, […]

भंडारा : शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानातर्गंत अहिल्या शेळी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे 10 ते 25 डिसेंबर 2022 पर्यत मागविण्यात येत आहे. अहिल्या शेळी योजनेतर्गंत जिल्ह्यातील 18 ते 60 वर्षामधील अनुसूचित जाती/जमाती, दारिद्र्य रेषेखालील अल्प भूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यन्त भूधारक) लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेमध्ये महिला अर्जदारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार […]

नागपूर :- ईपीएस 95 योजनेखाली मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनचा निषेध म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी मंगळवार, 27 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर मोर्चाने धडकणार आहेत. ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय समिती, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांच्या संयुक्त वतीने हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथून दुपारी 1 वाजता निघेल. पेन्शनवाढीसाठी महाराष्ट्र सरकारने केन्द्र सरकारवर दबाव आणावा, या मागणीचे निवेदन मोर्चातर्फे मुख्यमंत्री, […]

Ø कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नागपूर :- भारतीय संस्कृती, आयुर्वेद, योग या गोष्टी जाणून घेण्यास जग आतूर आहे. जगातील इतर देशातील लोकांचीही संस्कृत शिकण्याची इच्छा आहे. संस्कृत ही केवळ राष्ट्रहिताचीच नव्हे तर मानवहिताची भाषा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज रामटेक येथे केले. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या 11 व्या दीक्षांत सभारंभप्रसंगी […]

नागपूर :-बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने  सर्वसामान्यांचे बाबा गाडगेबाबा यांचा 66 वा स्मृतिदिन मेडिकल चौक परिसरातील संत गाडगेबाबा धर्म शाळेतील गाडगेबाबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला बसपा प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, रंजनाताई ढोरे, उत्तम शेवडे यांच्या प्रमुख उपस्थित माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी चंद्रशेखर कांबळे, प्रकाश फुले, महिपाल सांगोळे, कुणाल खोब्रागडे, सदानंद जामगडे, तपेश पाटील, बुद्धम् राऊत, अड अतुल पाटील, विलास […]

नागपूर : चीनसह अन्य काही देशांत कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कृती दल गठित करून केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, […]

नागपूर  :- “जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्यावर एक लाख 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. विनाअनुदानित तथा अंशत: अनुदान शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनुदानासंदर्भात सदस्य संजयमामा शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित […]

नागपूर :- घेतले खोके, भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो… बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो… भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री…गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास […]

नागपूर : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सुयोग पत्रकार निवासस्थानी भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. सुयोग येथील सभागृहात झालेल्या अनौपचारिक चर्चेत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजना, विकासकामांच्या नियोजनाची माहिती दिली. सुयोग शिबिरप्रमुख विवेक भावसार व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, घरांची वाढलेली संख्या, गावे-शहरांचा विस्तार पाहता रस्त्यांची लांबी वाढली आहे. गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी […]

नागपूर : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे हा कार्यक्रम झाला. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी […]

वाडी (प्र) : माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक ग्राम फेटरीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. थेट सरपंच निवडणुकीत आघाडीचे रवींद्र खांबलकर हे विजयी झाले.नऊ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस-राकाँ समर्थित फेटरी विकास आघाडी पॅनलचे पाच सदस्य निवडून आले. सरपंच पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते परंतु, मुख्य लढत काँग्रेस-राकाँ आघाडीचे उमेदवार रवींद्र खांबलकर (६५७) आणि भाजपाचे […]

पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नागपूर :- पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. विधिमंडळाच्या […]

– अर्बन डिझाईन सेल अंतर्गत मनपाला करणार सहकार्य नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि वुमन्स एज्यूकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर (एसएमएमसीए) नागपूर यांच्यात बुधवारी (ता.२१) सामंजस्य करार झाला. मनपा आयुक्त कक्षामध्ये करारावर मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. आणि श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चरच्या प्राचार्या डॉ. रूपल देशपांडे यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी कार्यकारी अभियंता सोनाली […]

नागपूर :- ‘कोरोना’ संकटाबाबतचा प्रशासनाला अनुभव आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली होती. ‘कोरोना’च्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता असून राज्यसरकारने ‘कोरोना’चा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आज केली. दरम्यान याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या माध्यमातून तातडीने टास्क फोर्स […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com