योग शिबिरांस उत्तम प्रतिसाद, पतंजली योग समिती व योगनृत्य परिवाराचा सहभाग

चंद्रपूर  :- चंद्रपूर महानगरपालिका, पतंजली योग समिती व योगनृत्य परिवाराद्वारे अनुक्रमे २२ व २४ जानेवारी पासुन चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी योग शिबिरे घेतली जात आहेत. या शिबिरांना नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असुन सदर वर्ग कायम सुरु राहावे तसेच नविन शिबिरेही सुरु व्हावी या दृष्टीने नियोजन केले जात आहे.

आज योगाला मानवी आरोग्याचा रक्षक म्हणुन जागतिक मान्यता मिळालेली आहे. नागरीकांचे आरोग्य निरोगी राहावे या दृष्टीने योगाचा प्रचार प्रसार करण्यास मोठ्या प्रमाणात योग शिबिरे घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिका व पतंजली समिती द्वारे रामकृष्ण मंदिर कृष्ण नगर,श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान स्नेहनगर,नुतन व्यायामशाळा घुटकाला वॉर्ड, पाचदेऊळ मंदिर गंज वॉर्ड,मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.५ बाबुपेठ,काळाराम मंदिर समाधी वार्ड,हनुमान मंदिर वैद्य नगर तुकूम येथे तर योगनृत्य परीवारातर्फे दीनदयाळ उपाध्याय गार्डन दुर्गा माता मंदिर जवळ सरकार नगर, पंचतेली हनुमान मंदिर जटपूरा गेट,नेहरू विद्यालय घुटकाळा वार्ड,महाकाली कॉलरी कँटीन चौक,हिंगलाज भवानी शाळा बाबुपेठ,कोहिनुर स्टेडीयम, पं. दीनदयाळ उपाध्याय शाळा तुकूम अश्या एकुण १४ ठिकाणी सकाळी ६ ते ८ या वेळेत योग शिबिरे घेतली जात आहेत तसेच येणाऱ्या नागरीकांची आरोग्य तपासणीही मनपा आरोग्य विभागातर्फे केली जात आहे.

निरोगी व स्वास्थ्य आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती,रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी ही योग प्राणायाम व आरोग्य शिबिरे आयोजीत करण्यात आली असुन जे नागरीक योग वर्ग व त्याद्वारे होणाऱ्या लाभापासुन वंचित आहे त्या सर्वांसाठी ही शिबिरे घेतली जात आहेत. याद्वारे योगचा प्रचार प्रसार होण्यास मदत मिळत असुन शिबिरांचा अधिकाधिक नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ, वनिता गर्गेलवार,गोपाल मुंधडा, डॉ. सपनकुमार दास यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अंजली साटोणे, स्मिता रेभनकर,नसरीन शेख, अपर्णा चिडे,ज्योती मसराम, विजय चंदावार, कविता मंघानी ,रमेश ददभाल, सपना नामपल्लीवार, नीलिमा शिंदे,ज्योती राऊत, कल्याणी येडे तर योगनृत्य परिवाराचे विशाल गुप्ता, सुरेश घोडके आकाश घोडमारे, मुग्धा खांडे पूनम पिसे, मीना निखारे तसेच सर्व मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वारे शिबिरांच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले जात आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com