ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

नागपूर : या वर्षाअखेरिस मुदत संपणाऱ्या आणि नव्याने प्रस्तावित होणाऱ्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूकी करीता नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये एकूण 365 ग्रामपंचायतीचा 30 जानेवारी, 2023 पासून प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 मध्ये मुदत संपणा-या ग्रामपचायतीचा सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

प्रभाग रचना कार्यक्रम – 30 जानेवारीपर्यंत तहसिलदार यांनी गुगल अर्थचे नकाशे सुपर इंमोज करुन अंतिम करावेत. 7 फेब्रूवारीपर्यंत सबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन सीमा निश्चित करावी. 15 फेब्रुवारीपर्यंत तहसिलदार यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापीत समितीने प्रभाग रचनेची तपासणी करावी. या समितीमध्ये गटविकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल. 21 फेब्रुवारी पर्यंत सदर समितीने प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा. 3 मार्चपर्यंत जिल्हाधिकारी यांनी नमुना ब (प्रारुप प्रभाग रचना) ची संक्षिप्त तपासणी करुन त्यात आवश्यक असल्यास दुरुस्ती करुन मान्यता देतील. 14 मार्चपर्यंत झालेल्या दुरुस्ती अंर्तभुत करुन प्रारुप प्रभाग रचना तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी करावी.

17 मार्च पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेला नमुना ब यामध्ये व्यापक प्रसिध्दी देऊन तहसिलदार यांनी हरकती व सुचना मागविण्यात याव्यात. 24 मार्च ही प्रारुप प्रभाग रचेनवर हरकती मागविण्याची अंतिम तारीख असेल. 28 मार्च रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सुचनांवर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणी करण्यात येईल. 6 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकतीं व सुचना यावर उपविभागीय अधिकारी अंतिम सुनावणी घेतील. 11 एप्रिल रोजी आलेल्या प्रत्येक हरकती व सुचनांवर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल.

प्रभाग रचना अंतिम करणे

17 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करुन राज्य निवडणूक आयोगास सादर करतील. 25 एप्रिल रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी (नमुना अ मध्ये) व्यापक प्रसिध्दी देतील, असे उपसचिव मनोज जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com