बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाच्यावतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन 29 जानेवारी रोजी

नागपूर :- बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ (विदर्भ प्रदेश) नागपूर च्यावतीने पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सांगितले की, समाजाच्या वतीने भव्य वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन येत्या 29 जानेवारी रोजी, सकाळी १०:३० वाजता. जट्टेवार सभागृह, ईश्वर नगर रमणा मारुती नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमात समाजातील मान्यवरांचा सत्कार, समाज उत्थनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा नागरिक सत्कार, तसेच समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा समाज भूषण पुरस्कार, देऊन सत्कार करण्यात येईल. असे पत्रकारांना यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपवर मुलां -मुलींसह परिचय मेळाव्याकरिता जास्तीत जास्त मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे अध्यक्ष जानराव पाटील केदार यांनी म्हटले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com