विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त शपथ

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात 13 व्या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त विभागीय आयूक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करु अशी प्रतिज्ञा दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमाला उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, मिलिंदकुमार साळवे, राजलक्ष्मी शहा, कमलकिशोर फुटाणे, सहायक आयुक्त मनोहर पोटे, संघमित्रा ढोके, याच्यासह तहसिलदार अरविंद सेलोकार अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com