तुळशी विवाह कालावधी या वर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी (15 नोव्हेंबर) पासून ते कार्तिक पौर्णिमा (19 नोव्हेंबर) पर्यंत आहे. यानिमित्ताने तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा ? यासंबंधीची शास्त्रीय माहिती तसेच आपत्कालीन स्थितीत तुळसी विवाह साजरा करण्याविषयी […]
Marathi News
सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे क्रांतिगुरू व शारीरिक गुरु लहुजी साळवे वस्ताद यांच्या जयंती निमित्ताने बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप मेश्राम व महाराष्ट्र प्रदेश बसपा चे जेष्ठ नेते उत्तम शेवडे ह्यांनी लहुजी साळवे ह्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी झालेल्या छोटेखानी सभेचे संचालन नागपूर जिल्हा सचिव मनोज निकाळजे यांनी तर समारोप दक्षिण-पश्चिम चे माजी अध्यक्ष […]
महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे मुस्लिम मौलवी, मशीद पदाधिकाऱ्यांना आवाहन चंद्रपूर, : चंद्रपूर शहरातील १८ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील ८० टक्के व्यक्तींनी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली. मात्र, मुस्लिमबहुल भागात अद्यापही टक्केवारी कमी आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखून धरण्यासाठी अफवांवर विश्वास ठेवू नका; कोरोना लसीकरणाला सहकार्य करा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. महानगरपालिकेने शहरातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी राणी हिराई […]
भदंत ससाई यांचे आवाहन नागपूर – फटाक्यांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत असले तरी बच्चे कंपनीला आनंद मिळतो. क्षणिक आनंद घेण्यासाठी लहान मुले पालकांकडे आग्रह धरतात. मुलांच्या आनंदासाठी पालकही फटाक्यांची आतषबाजी करतात. मात्र, आनंद बाजुला सारून फटाक्यांची आतषबाजी न करता बालकांनी एक प्रकारे पर्यावरणाला सहकार्य केले. अशा बालकांचे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी कौतुक केले. […]
वाडी(प्र): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्यां स्मृतिदिनी वाडी शहर शिवसेनेने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. शहर प्रमुख मधू माणके पाटील व उपतालुका्प्रमुख रुपेश झाडे यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी मौन पाळून भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर शिवसैनिकांनी महाराष्ट्र घडविण्याचे कार्य करावे असे भावनिक आवाहन उपस्थितां तर्फे करण्यात आले.कार्यक्रमाला […]
रामटेक – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी दिनांक १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राबविण्यात येत आहे. तसेच १३ नोव्हेंबर २०२१ व दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ तसेच दिनांक २७ नोव्हेंबर […]
नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. आतापर्यंत इच्छूकांनी 33 अर्जाची उचल केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-2021 अंतर्गत स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. 16 नोव्हेंबरला या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नामनिर्देशनची शेवटची तारीख 23 […]
भंडारा, दि. 17 : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त 14 नोव्हेंबर 2021 रोजी युवा रुरल चाईल्ड लाईन यांच्या मार्फत इंदिरा गांधी वार्ड येथे चाईल्ड लाईन दोस्ती सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चाईल्ड लाईनची माहिती व बालकांचे अधिकार, बालमजुरी, बालविवाह, बालभिक्षेकरु, सापडलेले बालक, बालकांना उद्भवणाऱ्या समस्या या बद्दल माहिती देण्यात आली. चाईल्ड लाईन सप्ताह मध्ये नागरिकांनी चाईल्ड लाईन […]
मुंबई, दि. 17- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट […]
मुंबई दि 17 ; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी दिली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडूनकेलेल्या अन्वेषणातून असे निदर्शनास आले, श्री. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी नामक व्यक्तीने में. गौरी इस्पात, मे तेज स्टील, मे गजानन एंटरप्रायझेस, या नावेमहाराष्ट्र वस्तू व सेवाकर […]
नागपूर, दि. 17 : नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची पूर्तता केल्यामुळे वैमानिक प्रशिक्षणाला मान्यता मिळाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाइंग क्लबच्या अध्यक्षा श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिली. डीजीसीएची मान्यता मिळाल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. नवी दिल्ली येथील नागरी विमान उड्डयण महासंचालनालयतर्फे वैमानिक प्रशिक्षणासाठी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. नागपूर […]
चंद्रपूर, ता. १७ : निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत छायाचित्रासह मतदार नोंदणी, मतदारयाद्यांचे शुध्दीकरण आणि सुसूत्रीकरण, दावे व हरकती स्वीकारणे, सुधारित अंतिम यादी प्रसिध्द करणे ही कामे ३० नोव्हेंबरपर्यंत केल्या जाणार आहेत. त्यानुसार १८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येकाने मतदार यादीत आपली नोंदणी करुन निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे. सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य निभवावे, असे आवाहन मनपाचे उपायुक्त […]
नागपूर, ता. १७ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. १७ नोव्हेंबर) रोजी ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३१,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३३ मंगल कार्यालय, १९ मंदीरे, ११ मस्जिद, ३२ शाळा व कॉलेज आणि अन्य १५ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण ११० स्थळांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन […]
नागपुर : थोर देशभक्त क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त उत्तर नागपुरातील नारी म्हाडा कॉलनी मैदानावर बिरसा मुंडा यांचा जन्म सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. बिरसा मुंडा यांच्या फोटोला माल्यार्पण व अभिवादन केलेत व मिठाई व प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक मोनू उमराव धुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यावेळेस यशस्वीरित्या पप्पू मसराम, विजय मरकाम, राजेंद्र […]
मुंबई, दि. 17 : श्री. विनय कुमार सिन्हा यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला. राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर श्री. विनय कुमार सिन्हा यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून 28 ऑक्टोबर 2021 च्या अधिसूचनेनुसार नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्य माहिती आयुक्त, अमरावती […]
सावनेर – नागपूर जिल्हा युवक काँग्रेस वाहतूक सेलच्या अध्यक्षपदी बहुचर्चित अमोल ( गुड्डू) खोरगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल सीरिया यांनी अमोल( गुड्डू) खोरगडे यांना नियुक्तीपत्र दिले. अमोल खोरगडे हे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस चे सक्रिय कार्यकर्ते असून काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यक्रमात व आंदोलनात सक्रिय होते. आपल्या नियुक्ती निमित्त अमोल (गुड्डू) खोरगडे यांनी महाराष्ट्र […]
नागपूर, दि. 16 : नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. आतापर्यंत 14 इच्छूकांनी 17 अर्जाची उचल केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-2021 अंतर्गत स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. 16 नोव्हेंबरला या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली […]
नागपूर, दि. 16 : रेशीम शेतीबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, नागपूर मार्फत संपूर्ण जिल्हयात महारेशीम अभियान 25 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी विजय रायसिंग यांनी केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत तीन वर्षासाठी तुती लागवड व किटक संगोपनगृह बांधकामासाठी मजूरी व सामुग्रीसाठी प्रतीएकर 3 […]
आरोग्य मंत्री टोपे यांची केंद्रीयमंत्री मंडाविया यांच्याकडे मागणी नवी दिल्ली, दि. 16 : कोविड प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांतील अंतर कमी करावे, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांची निर्माण भवन येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान श्री. राजेश टोपे यांनी श्री. मंडाविया […]
विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक भंडारा, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदारांची नोंदणी करण्यासह मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील […]