सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे क्रांतिगुरू व शारीरिक गुरु लहुजी साळवे वस्ताद यांच्या जयंती निमित्ताने बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप मेश्राम व महाराष्ट्र प्रदेश बसपा चे जेष्ठ नेते उत्तम शेवडे ह्यांनी लहुजी साळवे ह्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी झालेल्या छोटेखानी सभेचे संचालन नागपूर जिल्हा सचिव मनोज निकाळजे यांनी तर समारोप दक्षिण-पश्चिम चे माजी अध्यक्ष सदानंद जामगडे यांनी केला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना बसपा नेते संदीप मेश्राम व उत्तम शेवडे म्हणाले की सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले हे प्रस्थापित मनुवादी समाज व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करीत असताना ब्राह्मणवाद्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्ले केले. परंतु त्यांचे गुरू लहुजी वस्ताद यांनी शिकवलेल्या डावपेचामुळे त्यांनी ते जीवघेणे हल्ले परतवून लावले. एवढेच नव्हे तर सावित्रीबाई च्या पाठीशी प्रत्यक्ष खंबीरपणे उभे राहून लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांच्या शिक्षण कार्याला मदत केली. लहुजी साळवे यांच्या खंबीरतेमुळे च प्रस्थापित मनुवादी महात्मा फुले यांच्यावर शारीरिक हल्ले करण्याची हिंमत करीत नसत. जर लहुजी वस्ताद महात्मा फुले यांच्या पाठीमागे राहिले नसते तर महात्मा फुले दाम्पत्याचे प्रस्थापितांनी मुडदे पाडले असते. म्हणून महात्मा फुले यांच्या कार्यात लहुजी वस्ताद यांचे अनन्य साधारण महत्व असल्याची माहिती प्रदेश बसपाचे नेते उत्तम शेवडे व जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी दिली.
याप्रसंगी मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, बसपाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश फुले, प्यारेशाम नगराळे, अक्षय फरकाडे, निखिल भोवते, सुमित जांभुळकर, प्राध्यापक धनराज धडकार, मारोतराव कोडवते आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.