वाडी(प्र): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्यां स्मृतिदिनी वाडी शहर शिवसेनेने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. शहर प्रमुख मधू माणके पाटील व उपतालुका्प्रमुख रुपेश झाडे यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी मौन पाळून भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर शिवसैनिकांनी महाराष्ट्र घडविण्याचे कार्य करावे असे भावनिक आवाहन उपस्थितां तर्फे करण्यात आले.कार्यक्रमाला मधू माणके पाटील,रुपेश झाडे,प्रमोदजी जाधव , दिवाणजी रहांगडाले,किशोर ढगे,संतोष केशरवाणी,विलास भोंगळे,वैभव राजे,शिवम राजे,भावेश माणके पाटील,बादल गोमकार, गुलशन शेंडे,गौरव उगले,सचिन पाटील,विनय वडे,अखिल भोयर,अजय देशमुख,अंकित वऱ्हाडकर,उमेश महाजन इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन रुपेश झाडे यांनी केले.
वाडीत बाळासाहेबांना ठाकरे यांना स्मृतिदिनी आदरांजली
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com