सावनेर – नागपूर जिल्हा युवक काँग्रेस वाहतूक सेलच्या अध्यक्षपदी बहुचर्चित अमोल ( गुड्डू) खोरगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल सीरिया यांनी अमोल( गुड्डू) खोरगडे यांना नियुक्तीपत्र दिले. अमोल खोरगडे हे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस चे सक्रिय कार्यकर्ते असून काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यक्रमात व आंदोलनात सक्रिय होते.
आपल्या नियुक्ती निमित्त अमोल (गुड्डू) खोरगडे यांनी महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा ना सुनील केदार यांचे आभार मानले.
दिनेश दमाहे