विधान परिषद निवडणूक दुसऱ्या दिवशी एकही अर्ज नाही

 नागपूर :  नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. आतापर्यंत  इच्छूकांनी 33 अर्जाची उचल केली आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-2021 अंतर्गत स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. 16 नोव्हेंबरला या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

नामनिर्देशनची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर असून 24 नोव्हेंबरला दाखल अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर आहे. तर मतदानाचा दिवस 10 डिसेंबर असा आहे. मतमोजणी 14 डिसेंबरला होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

३० नोव्हेंबर पर्यंत नाव मतदार यादीत नोंदणी करुन घ्यावे -  तहसीलदार

Thu Nov 18 , 2021
रामटेक – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी दिनांक १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राबविण्यात येत आहे. तसेच १३ नोव्हेंबर २०२१ व दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ तसेच दिनांक २७ नोव्हेंबर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com