नागपूर – आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ब्रिटिशांशी लढा देऊन स्वातंत्र्याचा लढा तेवत ठेवणारी मर्दानी वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १८६व्या जयंतीनिमित्त सीताबर्डी, झाशी राणी चौक येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याला नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनीषा धावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक संजय बंगाले, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, माजी नगरसेविका नीता […]

मुंबई – शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली.ते इचलकरंजी येथे पत्रकारांशी बोलत होते.              ते म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला […]

काटोल  – विदर्भ महाकबड्डी स्पर्धेत  खेळत असतांना मोर्शी येथे सामना दरम्यान अचानक तब्बेत खराब होऊन चक्कर येऊन पडली. त्यामुळे कु. प्रीती पुरुषोत्तमजी सातपुते हिला दि. 13 नोहेबर ला नागपूर येथे भरती करण्यात आले होते. ब्रेन ट्युमर असल्याचे समोर आल्याने सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असतांना आज दि. 19 ला पहाटे तिने अखेरचा स्वाश घेतला.  अतिशय भावुक वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. […]

नागपुर – आज सुदर्शन स्वामी यांची जयंती बहुजन समाज पार्टीने बेझनबाग च्या सुदर्शन कॉलनीत बरगद चौक मध्ये गुरुनानक शाळेसमोर भव्य प्रमाणात साजरी केली. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश बसपाचे नेते उत्तम शेवडे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल,  माजी शहर अध्यक्ष महेश शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुदर्शन स्वामीं यांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी बसपाचे माजी पक्षनेते गौतम पाटील, नागपूर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष मुकेश मेश्राम, मध्य […]

चंद्रपूर, ता. १९ : विविध स्पर्धामध्ये यशस्वी ठरलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वानिमित्त विधी प्राधिकरण चंद्रपूरतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत मनपाच्या शाळांमधील कृणाली बुधबावरे (वर्ग ६वा), निबंध स्पर्धेत त्रिशा दुर्योधन (वर्ग ९वा) यांनी यश प्राप्त केले. हैद्राबाद येथील कराटे स्पर्धेत शितल बंडू मेश्राम (वर्ग ८वा) हिला गोल्ड मेडल मिळाले. त्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी (माध्यमिक) मनोज […]

नागपूर-  भारताच्या पहिल्या व एकमेव महिला पंतप्रधान ‘भारतरत्न’, ‘शक्ती स्वरूप’ श्रीमती इंदिरा गांधी (१९ नोव्हेंबर १९१७ – ३१ ऑक्टोबर १९८४) यांची १०४वी जयंती आज शुक्रवार, दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. नासुप्रचे महाव्यवस्थापक श्री. निशिकांत सुखे यांच्याहस्ते श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी […]

मुंबई, दि. १९ :  महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील विविध संस्थांना आर्थिक स्त्रोत उपलब्ध व्हावा यासाठी या संस्थांकडील मालमत्ता वाढीव भाडेपट्ट्याने देण्यास किंवा त्यांचा विकास करण्यास मान्यता देण्यात येते. मुंबई तसेच मुंब्रा येथील वक्फ संस्थांना नियमानुसार तसेच संबंधीत संस्थेने अर्ज दाखल केल्यानंतर वक्फ मंडळाच्या आणि शासनाच्या मान्यतेनेच त्यांच्याकडील मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती वक्फ मंडळाचे मुख्य […]

मुंबई दि. 19 :  भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती,  उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती,  राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती राष्ट्रीय फेलोशीप, निःशुल्क कोचिन शिष्यवृत्ती योजना सुरू आहेत. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर  यांनी केले आहे.             शिष्यवृत्ती योजना संदर्भात विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे.दिव्यांग विदयार्थ्यासाठी प्री […]

बेला – बेला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव लांबट येथील एक 14 वर्षीय पीडित मुलगी कोमल बदललेले नाव तिच्यावरआरोपी  उद्धव जयंत लांबट वय 33 वर्ष याने बळजबरीने जीवे मारण्याची धमकी देऊन तिला निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला। दिनांक 16 नंबर 2021 ला दुपारी एक ते चारच्या दरम्यान आरोपी उद्धव जयंत लांबट आपल्या मोटरसायकलने पीडित मुलीला फूस लावून जबरदस्तीने बसवून कवलापूर मार्गे […]

नागपुर –   भाजप वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारा वैद्यकीय क्षेत्रात ईश्वरीय सेवाकार्य करणाऱ्या मान्यवर डॉक्टरांना भारत सरकारचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पुरस्कार सन्मान सोहळा आज शनिवारी दि 20 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी भाजप शहर अध्यक्ष आमदार श्री प्रवीणजी दटके, राज्यसभा खासदार डॉ विकासजी […]

रामटेक :- रामटेक शहरात  वैकुंठ चतूर्थदशी निम्मित   विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू होते. पहिल्या दिवशी शोभायात्रा , दुसऱ्या दिवशी त्रिपुर पौर्णिमा व रथ यात्रा , तर तिसरा आणि शेवटचा दिवस म्हंजे मंडई. रामटेककरांसह संपूर्ण तालुक्यातील लोकांनी मंडई चा आनंद घेतला. ठिकठिकाणी तमाशा, नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषद  रामटेक तर्फे शाहीर यांचे  शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले .  नगर परिषद […]

चंद्रपूर, ता.१९ : एका दिवशी एका ऑटोतून अनेक जण प्रवास करतात. एखाद्या प्रवाशाला आजार असेल, कोरोनाची लक्षणे असतील, हे सांगता येत नाही. अशावेळी कोरोनाचा ‘सुपरस्प्रेड‘ झाल्यास सर्वांचे जीवन धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे महत्वाचे असल्याने लस घेतली नसेल तर ऑटोत प्रवेश नाही, असा निर्णय मनपाने घेतला आहे. चंद्रपूर शहरातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी ऑटोचालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक […]

चंद्रपूर, ता. १९: कोरोनाला हद्दपार करण्यासाठी १०० टक्के लसीकरण आवश्यक असून, लोकांच्या सतत संपर्कात असलेल्या सेवापुरवठादारांची तपासणी करून घेण्यात येत आहे. ज्या आस्थापनाधारकांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, अशा ठिकाणी लाल, तर संपूर्ण लस घेतलेल्या ठिकाणी हिरव्या रंगाचे  स्टिकर लावण्यात येत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. फेरीवाले, सेवापुरवठादार यांनी लसीकरण […]

गकडचिरोली, (जिमाका) दि.18 – विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम संपन्न  मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे, दि.01.01.2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्याकरीता राजकीय पक्षांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय […]

भंडारा, दि. 18:  अतिवृष्टीमुळे राज्यातील सोयाबीन बिजोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. याच दृष्टीने कृषी विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात भंडारा, पवनी, लाखांदुर तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड करण्याऱ्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नुकतीच जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबत बैठक घेतली. शासन निर्देशानुसार महाबीज व्दारे जिल्ह्यात रब्बी/उन्हाळी 2021-2022 हंगामात 100 हेक्टर क्षेत्राचा त्रृटीपुर्ती सोयाबीन जेएस-9305 वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रम तालुका कृषी […]

नागपुर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ जनजागरण अभियान अंतर्गत दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार सुधाकर कोहळे यांची प्रमुख उपस्थिती असून प्रमुख अतिथी गिरीश पांडव व गुणेश्वर आरीकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला. नुकत्याच झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात पिपळा रोड येथील मानमोडे लॉन येथे ओबीसी समाजाला जागृत करणे म्हणजेच समाजाला […]

–  रुग्ण डिस्चार्ज 00, एकूण डिस्चार्ज 58969, एकूण पॉझिटिव्ह 60104, क्रियाशील रुग्ण 02, आज मृत्यू शून्य, एकूण मृत्यू 1133,रिकव्हरी रेट 98.11 टक्के,मृत्यू दर 01.89,आजच्या टेस्ट 288,एकूण टेस्ट 472872 भंडारा – जिल्ह्यात गुरुवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.18) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. गुरुवारी 288 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58969 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60104 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 72 हजार 872 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60104 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह […]

सावनेर – दर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिध्द असलेल्या कळमेश्वर तालुक्यातील चंद्रभागा नदीच्या तिरावर वसलेल्या धापेवाडा येथील स्यंभू विठ्ठल रुख्मिणीचा दर्शन सोहळा आषाढ महिन्यातील एकादशीला तसेच कार्तिक वद्य व्दितीया व तृतीयेला गावातून मंदिरापर्यंत रथयात्रा निघते. इ.स. 1906 मध्ये श्रीमती भागीरथीबाई जमादार यांनी एक विशालकाय रथ बनवून विठ्ठल चरणी अर्पण केला. प्रतिवर्षी कार्तिक वद्य व्दितीया व तृतीयेला गावातून मंदिरापर्यंत रथयात्रा निघते. ही रथयात्रा […]

मुंबई- सर्वसमाजसमावेश आणि विकास सूत्राच्या धोरणाची अंमलबजावणी करीत बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी शिस्तबद्धरित्या मेहनतीच्या बळावर देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या महानगर पालिकेवर पार्टीचा निळा झेंड फडकावतील, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी व्यक्त केला.गोरेगाव पूर्व येथे श्याम मंदिर सभागृहात नुकताच आयोजित ‘महापौर बनाओ अभियाना’च्या कार्यक्रमातून कॅडर ला संबोधित करतांना त्यांनी आगामी निवडणुकीसंबंधी पक्षाची भूमिका मांडली. मा.बहन मायावतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली […]

नागपुर – महापौर बनाओ अभियान अंतर्गत उद्या 20 नोव्हेंबर रोजी डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन उरुवेला कॉलनी येथे नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने दुपारी 11 वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नुकतेच महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी म्हणून नवनियुक्त झालेले धरमवीरसिंग अशोकजी पहिल्यांदा नागपुरात येऊन मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशचे दुसरे प्रभारी व राज्यसभा खासदार डॉक्टर अशोकजी सिद्धार्थ […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com