नागपूर – आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ब्रिटिशांशी लढा देऊन स्वातंत्र्याचा लढा तेवत ठेवणारी मर्दानी वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १८६व्या जयंतीनिमित्त सीताबर्डी, झाशी राणी चौक येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याला नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनीषा धावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक संजय बंगाले, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, माजी नगरसेविका नीता ठाकरे, शहर महामंत्री मनीषा काशीकर आदी उपस्थित होते.
दिनेश दमाहे
9370868686