मुंबई महानगर पालिकेवर बसपाचा निळा झेंडा फडकणार – बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा दावा

मुंबई- सर्वसमाजसमावेश आणि विकास सूत्राच्या धोरणाची अंमलबजावणी करीत बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी शिस्तबद्धरित्या मेहनतीच्या बळावर देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या महानगर पालिकेवर पार्टीचा निळा झेंड फडकावतील, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी व्यक्त केला.गोरेगाव पूर्व येथे श्याम मंदिर सभागृहात नुकताच आयोजित ‘महापौर बनाओ अभियाना’च्या कार्यक्रमातून कॅडर ला संबोधित करतांना त्यांनी आगामी निवडणुकीसंबंधी पक्षाची भूमिका मांडली.

मा.बहन मायावतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरूण नेतृत्व आकाश आनंद यांच्या नेतृत्वात प्रदेश प्रभारी खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ साहेब, माजी मंत्री व प्रदेश प्रभारी मा. धर्मवीर सिंह अशोक साहेब, मा.प्रमोद रैना जी यांच्या दृरदृष्टीपूर्ण नेतृत्वक्षमतेत पार्टी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन करेल, असा दावा देखील अँड.ताजने यांनी केला. प्रभाग, वॉर्डातील प्रत्येक घरापर्यंत जनसंपर्क विस्तारीत करीत पार्टीच्या वैचारिक भूमिकेबद्दल सर्वसामान्यांना साक्षर करण्याचे आवाहन यानिमित्ताने त्यांनी  केले.’मायक्रो’ पातळीच्या नियोजनानेच समाजकारणासाठी सत्तेचा मार्ग प्रशस्त होईल,असे प्रतीपादन त्यांनी केले.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावरच पार्टीचे यश अवलंबून असते. ‘कॅडर’ हाच बसपाचा प्राणवायु आहे. अशात प्रामाणिक आणि पक्षाच्या वैचरिकतेसोबत बांधिलकी ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्या, असे आवाहन प्रदेश प्रभारी मा.धर्मवीर सिंह अशोक यांनी केले. बसपा विजयासाठी निवडणूक लढवत नाही, तर पीडित, शोषित, उपेक्षितांना मुख्यप्रवाहात आणण्याच्या सामाजिक बांधीलकीच्या पुर्ततेसाठी हे आवश्यक असल्याचे मत सिंह यांनी व्यक्त केले. काहींनी राजकीय फायद्यासाठी  महाराष्ट्रात मराठी विरूद्ध उत्तर भारतीय असा वाद   पेटवला आहे. पंरतु, याचा कुठलाही फायदा या सत्तालोलूप पक्षांना होणार नाही. सर्वजनहितकार, सर्वसमावेश धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या बसपावरच मतदारांचा विश्वास असल्याचे येत्या निवडणुकीत दिसून येईल, असा विश्वास मा.धर्मवीर सिंह अशोक यांनी व्यक्त केला.

सर्व जाती, धर्म आणि सर्व राज्यातील नागरिकांना समान सन्मान देण्याचे काम बसपा करते. बसपाच्या याच सर्वसमावेश धोरणामुळे अनेक राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. पंरतु, बसपाचा प्रत्येक कॅडर पार्टीच्या भूमिकेशी प्रामाणिक असून निवडणुकीत तो खंबीरपणे उभा राहील, असे मत प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी व्यक्त केले. यंदाच्या निवडणुकीत तरूणांना मोठ्याप्रमाणात भागीदारी देण्यात येणार असल्याचे सूचक वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले.देशाच्या संविधानानूसार कुठल्याही राज्यातील नागरिकांना कुठल्याही राज्यात राहण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. पंरतु, संविधानाला न जुमानता मुंबईतील उत्तर भारतीयांना कुणी अन्यायकारकरित्या त्रास देण्याचा प्रयत्न केला तर बसपा कार्यकर्ते याचा निषेध व्यक्त करीत पीडितांच्या पाठीशी उभे राहतील, असे रैना म्हणाले.

कार्यक्रमात प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव रामसुमेर जैस्वार , नागसेन माला, मनोज हाळदे, मुकेश मासुम, मुंबई प्रभारी सुरेश महाडिक, श्यामलाल जैस्वार, हाजी मेहमूद , संदेश जगताप, कपिल बनसोडे, मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रवीण धोत्रे, उपाध्यक्ष शैलेश पवार  आणि सर्व विधानसभा मतदार संघ, वॉर्ड, सेक्टर आणि बुथ पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

धापेवाडयाची ऐतिहासिक रथयात्रा, एक दृष्टिक्षेप

Thu Nov 18 , 2021
सावनेर – दर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिध्द असलेल्या कळमेश्वर तालुक्यातील चंद्रभागा नदीच्या तिरावर वसलेल्या धापेवाडा येथील स्यंभू विठ्ठल रुख्मिणीचा दर्शन सोहळा आषाढ महिन्यातील एकादशीला तसेच कार्तिक वद्य व्दितीया व तृतीयेला गावातून मंदिरापर्यंत रथयात्रा निघते. इ.स. 1906 मध्ये श्रीमती भागीरथीबाई जमादार यांनी एक विशालकाय रथ बनवून विठ्ठल चरणी अर्पण केला. प्रतिवर्षी कार्तिक वद्य व्दितीया व तृतीयेला गावातून मंदिरापर्यंत रथयात्रा निघते. ही रथयात्रा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com