बेला – बेला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
बोरगाव लांबट येथील एक 14 वर्षीय पीडित मुलगी कोमल बदललेले नाव तिच्यावरआरोपी उद्धव जयंत लांबट वय 33 वर्ष याने बळजबरीने जीवे मारण्याची धमकी देऊन तिला निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला।
दिनांक 16 नंबर 2021 ला दुपारी एक ते चारच्या दरम्यान आरोपी उद्धव जयंत लांबट आपल्या मोटरसायकलने पीडित मुलीला फूस लावून जबरदस्तीने बसवून कवलापूर मार्गे मानस ऍग्रो साखर कारखाना मार्गावरील पडक्या क्वार्टरमध्ये नेऊन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता जयंत ने तिच्या गालावर 2,4 चापडा मारून जीवे मारण्याची धमकी देत तिला नग्न करून बलात्कार केला व तिला तिथेच सोडून देत मोटरसायकल ने आपल्या गावाकडे निघून गेला पीडित मुलगी आणि आरोपी एकाच गावचे असल्याने दोघेही एकमेकांना ओळखत होते या ओळखीचा फायदा घेत जयंत ने तिच्यावर अत्याचार केला
पीडित मुलगी कशीबशी उठली व स्वतःला सावरत बोरगाव येथे आपल्या घरी आली वडील शेतीवर राखणदार असल्याने ते घरी नव्हते म्हणून तिने सर्व आपबिती आपल्या काका व काकू ला सांगितली दुसऱ्या दिवशी 17 नोव्हेंबरला ही हकीकत वडिलांना सांगितली वडिलांनी पीडित मुलीस घेऊन सरळ बेला पोलीस स्टेशन गाठले ठाणेदार पंकज वाघोडे यांना सर्व घटना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ आरोपीला बोरगाव लांबट येथून ताब्यात घेतले व घडलेली सर्व माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांना कळविली पोलिसांनी मुलीला घेऊन घटनास्थळाची पाहणी केली व आरोपीवर अपराध क्रमांक 161 /21 कलम 363, 376 376/2, (i,) 325 506 भा द. वि. अंतर्गत गुन्हा दाखल केला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने सह कलम 4,8,12 पॉक्सो अंतर्गत व आदिवासी समाज असल्याने अॅट्रॉसिटी एक्ट नुसार कलम 3 /1 (11) दाखल करून प्राथमिक तपास बेलाचे ठाणेदार पंकज वाघुले यांनी पूर्ण केला व पुढील तपास उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड या करीत आहेत.,
दिनेश दमाहे
9370868686