नागपुर – आज सुदर्शन स्वामी यांची जयंती बहुजन समाज पार्टीने बेझनबाग च्या सुदर्शन कॉलनीत बरगद चौक मध्ये गुरुनानक शाळेसमोर भव्य प्रमाणात साजरी केली. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश बसपाचे नेते उत्तम शेवडे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, माजी शहर अध्यक्ष महेश शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुदर्शन स्वामीं यांना माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी बसपाचे माजी पक्षनेते गौतम पाटील, नागपूर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष मुकेश मेश्राम, मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण-पश्चिम चे माजी अध्यक्ष युवानेते सदानंद जामगडे, तपेश पाटील, प्रकाश फुले, सुबोध साखरे, अविनाश नारनवरे, मॅक्स बोधी, परेश जामगडे आदी प्रमुख कार्यकर्ता सहित मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.