गकडचिरोली, (जिमाका) दि.18 – विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम संपन्न मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे, दि.01.01.2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्याकरीता राजकीय पक्षांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त लवंगारे यांनी नवमतदार यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवा अशा प्रशासनाला सूचना केल्या तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही त्यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवाहन केले आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी संजय मीणा, उपायुक्त प्रशासन विभाग, नागपूर श्रीमती आशा पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, उप विभागीय दंडाधिकारी अहेरी श्री अंकित, उप जिल्हा निवडणुक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजया जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जे.पी. लोंढे , तहसिलदार महेंद्र गणवीर, नायब तहसीलदार सुनिता अभ्यारलावर, अव्वल कारकून आशिष सोरते, किशोर मडावी, विवेक दुधबळे, दीपक लाकूडवाहे तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. विभागीय आयुक्त यांनी यावेळी निवडणूक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. दिनांक 01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम व विशेष मोहिमांचा कालावधी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक दिनांक 01 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) रोजी, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी हा दिनांक 01 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार) पर्यंत राहील. विशेष मोहिमांचा कालावधी हा दिनांक 13 नोव्हेंबर, 2021 (शनिवार) व दिनांक 14 नोव्हेंबर, 2021 (रविवार) व दिनांक 27 नोव्हेंबर, 2021 (शनिवार) व दिनांक 28 नोव्हेंबर, 2021 (रविवार) राहील. दावे हरकती निकालात काढणे दिनांक 20 डिसेंबर, 2021 (सोमवार) पर्यंत. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा कालावधी, दिनांक 05 जानेवारी, 2022 (बुधवार).
तसेच यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी कर्मचाऱ्यांना निवडणूकीविषयी विविध सूचना दिल्या. सर्व 18 वर्षावरील युवक – युवतींना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष मोहिम चालविण्याकरीता सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी निवडणूक कामाविषयी विभागीय आयुक्तांना माहिती दिली.