संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 15 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कॅन्टोमेंट येथील गार्डस रेजिमेंटल सेन्टर परिसरातील टेलिफोन केबल च्या गोडाऊन मधून अज्ञात चोरट्याने संधी साधून गोडाऊन ची मागची भिंत तोडून गोडाऊन मध्ये अवैधरित्या प्रवेश करून गोडाऊन मधील 6लक्ष रुपये किमतीचे केबल वायर चोरीला गेल्याची घटना आज निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी विवेक सुरेशचंद्र पुणेका वय […]

संदीप कांबळे, कामठी -होळीचा रंग उधळा तो मात्र जपुनच कामठी ता प्र 15- दरवर्षी प्रमाणे यावर्षिसुद्धा होळी या पर्वनिमित्त 17 मार्च ला होळी सण तर 18 मार्च ला धुलिवंदन आहे .हिंदु धर्माध्ये होळी सणाला एक विशेष महत्व दिले जाते.होळी सण हा जीवनात रंगासोबत उत्साह निर्माण करनारा सण आहे या सनामध्ये नागरिक एकमेकांना रंग लाऊन शुभेच्छा देतात. यानुसार 17 मार्च ला […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र १५ मार्च – श्री राधे कृष्ण सेवा संस्था च्या वतीने होळी निमित्त येथील स्वामी विवेकानंद बाल सदन या अनाथालयातील बालकांना नवीन कपडे,रंग गुलाल व मिठाई चे वितरण नवी कामठी पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या हस्ते आज करण्यात आले . यावेळी कमलाकर गड्डीमे पोलिस निरीक्षक(गुन्हे),स्वामी विवेकानंद बाल सदन चे अध्यक्ष डॉ […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 15:- महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायत औद्योगिक नागरिक सुधारणा अधिनियमानुसार 2022 या राज्य शासनाच्या अधिनियमाला राज्यपालांनी मंजुरी दिल्याने गॅझेट राजपत्र प्रसिद्ध झाले आहे .नवीन अधिनियम तरतुदीनुसार 10 मार्च रोजी कामठी नगर परिषद ची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती या प्रभाग रचना आराखड्यावर 17 मार्च पर्यंत आक्षेप व हरकती मागविण्यात आले […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 15:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सोनेगाव राजा येथे विना नंबर असलेल्या ट्रॅकटर ने अवैधरित्या विना रॉयल्टी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर महसुल प्रशासनाच्या पथकाने यशस्वी कार्यवाही गतसकाळी साडे आठ दरम्यान केली असून या कार्यवाहितुन एक ब्रास अवैध वाळू जप्त करीत पुढील कार्यवाहिस्तव ट्रेकटर मौदा पोलीस स्टेशन ला लावण्यात आले. ही यशस्वी कार्यवाही तहसीलदार अक्षय पोयाम […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 15:- मागील दोन वर्षे कोरोना महामारीच्या सावटामुळे सन समारंभ सार्वजनिकरित्या साजरे करण्यावर निर्बंध होते .गर्दी टाळण्यासाठी चार पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव असल्याने होळी सारख्या रंगाचा उत्सवही निरुत्साहीपणे साजरा करण्यात आला होता.यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे.शिथिल झालेल्या कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्षांची मरगळ झटकून नागरिक होळी साजरी करण्याची तसेच धुलीवंदनाची नियोजन करीत […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 15 :- येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आयोजित अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.ही अंडवृद्धी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याने रुग्णांना मोठा दिलासा प्राप्त होत रुग्णांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ उन्हाळे, आदींनी मोलाची डॉ मानापुरे,डॉ द्विवेदी, ब्रदर शेख इम्रान, सुनील नरसिरकर,प्रवीण माने, वंदिले,मुलचंद फुलेवाले,नारायण धावडे, नितीन सावते,संजय फुलझेले, […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 15:- आज 15मार्च पासून कामठी तालुक्यात दहावीची परीक्षा सुरू झाली असून 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत होणाऱ्या 10 वीच्या परिक्षेकरिता कामठी तालुक्यातील 10 मुख्य व 31 उपमुख्य असे एकूण 41 परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली असून आजचा भाषा पहिला पेपर सुरळीत पार पडला . महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

नागपुर – सुपारीचे गोडावुनला लागलेल्या लोखंडी गेटचे कडी कोंडा तोडुन गोडावुनमध्ये  प्रवेश करून गोडावुनमध्ये  ठेवलेले सुपारी कटींग, प्रोसिजीग केलेले एकुण 14 बोरे, प्रति बोरा 70 किलो प्रमाणे एकुण 980 किलो, सुपारी प्रति किलो 500/रू. प्रमाणे एकुण 4,90,000/रू. 2) CCTV  कॅमेराच्या  डि.व्ही.आर. कि.अं. 4,450/रू. असा एकुण 4,94,450/रू. चा मुद्देमाल चोरी केला आहे .अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. […]

वित्त पुरवठा संस्थांनी केले नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे कौतुक नागपूर –  महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी के.एफ.डब्लू. जर्मनी आणि ए.एफ.डी फ्रांस सरकारच्या अंतर्गत विकास बँकेतर्फ नेमण्यात आलेली कमेटी २ दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर नागपूर येथे आले असून दिनांक १४ मार्च २०२२ रोजी या वित्तीय संस्थांनी मेट्रो भवन येथे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक […]

मुंबई – भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) ने बीते शुक्रवार को पेटीएम पेमेंट्स बैंक (पीबी) को नए ग्राहक जोडऩे से रोक दिया था, जिसकी प्रमुख वजह अपने ग्राहक को जानें (KYC) और, धनशोधन नियमों का उल्लंघन है। कई सूत्रों ने बिज़नेस स्टैंडर्ड को इसकी जानकारी दी। बैंकों से नया ग्राहक बनाने से पहले उसकी विस्तृत जांच-परख करने की उम्मीद की जाती […]

 मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर देणार असल्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.             विधानपरिषदेत नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था विषयक प्रस्तावावर उत्तर देताना श्री. देसाई बोलत होते. श्री. देसाई म्हणाले की, राज्यातील आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलिस दलावर कोरोनाच्या काळात कामाचा ताण पहायला मिळाला. कोरोनामुळे […]

मुंबई :  भंडारा जिल्ह्यातील बेला येथील महर्षी विद्या मंदिर शाळेबाबत प्राप्त तक्रारीसंदर्भात कार्यवाही सुरू आहे,  याबाबत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत  दिली.            भंडारा जिल्ह्यातील बेला येथील महर्षी विद्या मंदिर शाळेच्या गैरव्यवस्थापनाविरूद्ध शासनस्तरावरून कोणती कार्यवाही केली जात आहे, लोकप्रतिनिधीव्दारे शाळेची मान्यता रद्द   करावी अशी मागणी असणारी लक्षवेधी विधानसभा सदस्य नरेंद्र भोंडेकर यांनी मांडली होती.            शालेय शिक्षण […]

 मुंबई : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीची भरतीसंदर्भात प्राप्त तक्रारींची दखल घेवून चौकशी करण्यात येईल अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत  दिली.  चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये गैरप्रकल्पग्रस्तांची फेब्रुवारी महिन्यात प्रशिक्षणार्थी म्हणून भरती झाली असून याबाबत चौकशी करण्यात यावी अशी लक्षवेधी विधानसभा सदस्य सुभाष धोटे यांनी सभागृहात मांडली. यावेळी लक्षवेधीच्या चर्चेत विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यांनी भाग […]

मुंबई –  अवैध वाळूचोरी हा मोठा प्रश्न असून याबाबत महसूल विभागामार्फत काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे वाळू धोरण राबवितांना त्यात सहजता कशी येईल, याबाबत प्रयत्न करण्यात येत असून वाळू धोरणात काही बदल करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरातील अवैध रेतीची 8 प्रकरणे निदर्शनास आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या ठिकाणी सापडलेला साठा […]

 मुंबई : कोकण किनारपट्टीतील समुद्र तसेच नद्यांच्या जल प्रदुषणातील वाढ रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. समुद्र तसेच नद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे जल प्रदूषण होऊ नये यासाठी प्रदुषणासंदर्भातील नियमावली आणखी कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर परराज्यातील मच्छिमार राज्यात येऊन मासेमारी करतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा कठोर करणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली. मच्छिमारांचे प्रश्न […]

मुंबई :- शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त गेल्या दोन वर्षात शासनाने केलेल्या कामगिरीवर आधारित माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारलेल्या चित्रमय प्रदर्शनास  पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. यासंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुकही श्री.केदार यांनी केले. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे यांची उपस्थित होती. राज्य शासनाला दोन वर्षे […]

 – कापसाचे गाडीचे ड्रायव्हर आतमधे अडकून              “गावकऱ्यांचे मदतीने दोन जेसीबी मशीनव्दारा अथक प्रयत्न करून ड्रायव्हरल बाहेर काढून नागपूर हलविले.  रामटेक :- रामटेक तुमसर रोडवर शिवनी भोडकी जवळ किरणापूर शिवारात पो.स्टे. अरोली हट्टी, १४ मार्च रोजी दुपारी अंदाने ४ वाजताच सुमारास शिवनी वरून कापूस भरून हिवरा येथे ट्रक कृ MH 40 N 146 हा जात […]

अण्णा हजारे यांनी सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी केलेल्या आरोपावर आणि भाजप आमदाराने उपस्थित केलेल्या मुद्दयावर अजित पवारांनी मांडली भूमिका… मुंबई –  राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेला गैरव्यवहाराचा मुद्दा अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे तो अगोदरही केला होता त्यामुळे सहकार मंत्र्यांनी अण्णा हजारे यांना जाऊन भेटावे व यंत्रणामार्फत कोणकोणत्या चौकशा सरकारने केल्या याची माहिती देऊन ‘दूध का दूध, पानी […]

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची जोरदार बॅटींग;विरोधकांच्या आरोपांची हवाच काढून टाकली… मुंबई पोलिस दलावर विश्वास न ठेवता प्रत्येक प्रकरण सीबीआय किंवा अन्य यंत्रणेकडे द्या असे विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे दुःखद… आपण काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?पेनड्राईव्हवर गृहमंत्र्यांचा सवाल… पेनड्राईव्ह प्रकरणाचा सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय… मुंबई – केंद्रीय यंत्रणाचा वापर करताना आपले प्रवक्ते अमुक- तमुक नेत्यावर कारवाई होणार असे आधीच जाहीर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com