इकोफ्रेंडली वातावरणात होळीचा सण साजरा करा-डीसीपी मनीष कलवानिया

संदीप कांबळे, कामठी

-होळीचा रंग उधळा तो मात्र जपुनच

कामठी ता प्र 15- दरवर्षी प्रमाणे यावर्षिसुद्धा होळी या पर्वनिमित्त 17 मार्च ला होळी सण तर 18 मार्च ला धुलिवंदन आहे .हिंदु धर्माध्ये होळी सणाला एक विशेष महत्व दिले जाते.होळी सण हा जीवनात रंगासोबत उत्साह निर्माण करनारा सण आहे या सनामध्ये नागरिक एकमेकांना रंग लाऊन शुभेच्छा देतात. यानुसार 17 मार्च ला तालुक्यात विविध ठिकाणी विविध संघटनेच्या वतीने वाईटाचा नायनाट करने या भूमिकेतुन होलिकादहन कार्यक्रम राबवनार आहेत .होलिका दहन झाल्यानंतर वाईटाचा नायनाट केल्याच्या आनन्दात 18 मार्चला धुळीवंदनाचा सन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे हा दिवस आनंदाचा मौजमस्तीचा असून बुरा ना मानो होली है या म्हणीनुसार एकमेकांना रंग लावीत , गुलालाची उधळण करून मोठ्य उत्साहानेे साजरा होणारा धुुलिवंदनाचा हा पर्व इकोफ्रेंडली वातावरणात पाार पाडावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच होळीचा रंग उधळा तो मात्र जपूनच……असे आव्हान डीसीपी मनीष कलवानिया यांनी नागरीकांना केले आहे.
सर्वांनी रंगपंचमी शांततेत खेळावी , इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन सण साजरे करावे, तसेच अति उत्साहित न होता सामाजिक सलोख्याचे भान ठेवून सण साजरे करा, उत्साहाच्या भरात काही गैरकृत्य करून गुन्हा दाखल होण्याचा प्रसंग ओढवून घेऊ नका, कायदा व शिस्तीचे पालन करून सणोत्सव साजरे करण्याचे आव्हान सुद्धा परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी कॅन्टोमेंट परिसरात 6 लक्ष रुपयांची चोरी

Tue Mar 15 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 15 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कॅन्टोमेंट येथील गार्डस रेजिमेंटल सेन्टर परिसरातील टेलिफोन केबल च्या गोडाऊन मधून अज्ञात चोरट्याने संधी साधून गोडाऊन ची मागची भिंत तोडून गोडाऊन मध्ये अवैधरित्या प्रवेश करून गोडाऊन मधील 6लक्ष रुपये किमतीचे केबल वायर चोरीला गेल्याची घटना आज निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी विवेक सुरेशचंद्र पुणेका वय […]
kamptee

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com