फ्रांस आणि जर्मनीचे शिष्टमंडळ २ दिवसीय नागपूर दौऱ्यावर

वित्त पुरवठा संस्थांनी केले नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे कौतुक

नागपूर –  महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी के.एफ.डब्लू. जर्मनी आणि ए.एफ.डी फ्रांस सरकारच्या अंतर्गत विकास बँकेतर्फ नेमण्यात आलेली कमेटी २ दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर नागपूर येथे आले असून दिनांक १४ मार्च २०२२ रोजी या वित्तीय संस्थांनी मेट्रो भवन येथे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेत प्रकल्पा संदर्भात विस्तुत चर्चा केली. डॉ. दीक्षित यांनी प्रकल्पाच्या भौतिक आणि वित्तीय प्रगतीची माहिती वित्तीय चमूला देत मेट्रो द्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती देखील त्यांनी यावेळी त्यांना दिली.

के.एफ.डब्लू. आणि ए.एफ.डी. या दोन्ही वित्तीय संस्थांनी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या संयुक्त देखरेख मिशन अंतर्गत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची अंबलबजावणी कश्या प्रकारे सुरु आहे ;ज्यामध्ये तांत्रिकी,वित्तीय आणि इएसएचएस दृष्टीकोन तपासण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त या शिष्टमंडळाने रिच २ आणि रिच ४ मध्ये निर्माणाधीन पूर्णत्वाकडे येत असलेल्या प्रकल्पाची पाहणी करत समाधान व्यक्त केले.

या शिष्टमंडळात के.एफ.डब्ल्यू. जर्मनीचे वरिष्ठ क्षेत्र तज्ञ(के.एफ.डब्ल्यू. दिल्ली) स्वाती खन्ना, सेल हेड अर्बन डेव्हलपमेंट  फिलिप व्रिस्च,वरिष्ठ पोर्टफिलोयो प्रबंधक पॅट्रिशिया इमलर तसेच ए.एफ.डी. चे प्रकल्प व्यवस्थापक(एएफडी – दिल्ली)  रजनीश अहुजा यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. तसेच महा मेट्रोच्या वतीने संचालक(प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तीन सराईत गुन्हेगार ताब्यात, १ कट्ट्यांसह जिवंत काडतुस जप्त

Tue Mar 15 , 2022
नागपुर – सुपारीचे गोडावुनला लागलेल्या लोखंडी गेटचे कडी कोंडा तोडुन गोडावुनमध्ये  प्रवेश करून गोडावुनमध्ये  ठेवलेले सुपारी कटींग, प्रोसिजीग केलेले एकुण 14 बोरे, प्रति बोरा 70 किलो प्रमाणे एकुण 980 किलो, सुपारी प्रति किलो 500/रू. प्रमाणे एकुण 4,90,000/रू. 2) CCTV  कॅमेराच्या  डि.व्ही.आर. कि.अं. 4,450/रू. असा एकुण 4,94,450/रू. चा मुद्देमाल चोरी केला आहे .अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights