मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात जागतिक कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस जगभर पाळला जातो. यानिमित्ताने जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन रोग ओळखणे, रुग्णांची काळजी घेणे, रोगाशी लढण्याचे त्यांना बळ देणे, रूग्णांना भावनिक आधार देण्याबाबत जनजागृती केली जाते. या आजाराबाबत रूग्णांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने शासनाच्यामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
कर्करोग हा आजार काय आहे, या आजाराची लक्षणे, प्रभावी उपचार पद्धती, आरोग्याची घ्यावयाची काळजी अशा विविध विषयांवरील उपयुक्त माहिती, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.