मधकेंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नागपूर :-  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे.

वैयक्तिक मधपाळ पात्रता :- अर्जदार साक्षर असावा. स्वतःची शेती असल्यास प्राधान्य. वय 18 वर्षापेक्षा जास्त. केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ :- व्यक्ती पात्रता किमान 10 वी पास, वय 21 वर्षीपेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेतजमीन व लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था पात्रता :- संस्था नोंदणीकृत असावी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1000 चौ.फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादणा बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

अटी व शर्ती- लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ उद्योग भवन 6 वा माळा सिव्हिल लाईन नागपूर पी.के. आसोलकार मधुक्षेत्रिक मो नं.९४२११११६६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय ‘आय.एस.ओ.’ ने मानांकित

Thu Nov 30 , 2023
नागपूर :- कार्यालयाची आकर्षक सजावट कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा, कर्मचाऱ्यांना उपलब्ध केलेल्या सुविधा लक्षात घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाला ‘आय.एस.ओ.’ प्रमाणपत्राने मानांकित केले आहे. नागपूर जिल्हयात प्रथमच जेष्ठ नागरिकांसाठी कार्यालयात जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आलेले असून जिल्हयातील जेष्ठांच्या समस्या या कक्षामार्फत समुपदेशनाव्दारे सोडविण्याचे काम नियमितपणे केले जाते. सर्व योजनांचे सविस्तर माहिती असलेले फलक दर्शनी भागात लावण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com