बुट्टीबोरी :- फिर्यादी नामे कैलास दिलीपराव भूते, वय ३४ वर्ष, रा. प्लॉट नं. १४ टिपले ले आऊट लांबट लॉन जवळ खरबी ता. जि. नागपुर हे दि. २४/०५/२४ रोजी १९/०० वा. दरम्याण मित्र आदित्य खोब्रागडे याचा वाढदिवस असल्याने स्वताची होंडा अॅक्टीव्हा मोपेड क. एम एच ४९ बीएच ९५४८ किमती ५०,०००/- रु. ने बुटीबोरी येथे आला होता वाढदिवस आटोपल्यावर जेवन झाल्यावर मित्र आपल्या घरी गेले व रात्र जास्त झाल्याने फियांदी यांनी आपली मोपेड गाडीने बुटीबोरी मेन रोड येथे ऐकनाथ मामा कटींग दुकान समोर लावून तिथे असलेल्या खुर्चीवर झोपी गेला व दि २५.०५.२४ चे सकाळी ०६.३० वा दरम्याण उठला असता त्याला त्याची होड़ा अॅक्टीव्हा मोपेड क. एम एच ४९ बीएच ९५४८ किंमती ५०,००० रु. ची ही दिसली नाही ती कुणी तरी अज्ञात चोराने दिनांक २४.०५.२४ से २२.३० ते २५.०५.२४ से ०५.३० वा. दरम्यान चोरून नेली अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोस्टे ला सदर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये अनोळखी आरोपीचा शोध घेणे कामी वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हयाचे तपासकामी विशेष पथक गठीत करून अनोळखी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. गठीत पथकातील अधिकारी व अमलदार यांनी गोपनिय मुखविर पेरून गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असतांना मुखबीरद्वारे मिळालेल्या माहीती वरूण हिंगणघाट जि वर्धा येथुन १) सदर गुन्हयाचे तपास करीत नमूद अटक आरोपी १) यश विठ्ठल ठाकरे वय १९ वर्ष रा संत तुकडोजी वार्ड निखाडे ने आऊट हिंगणघाट ता वर्षा २) सम्राट पहरी चोटे वय १९ वर्ष रा. शंभरकर संत तुकडोजी पार्क चौध्द विहार जवळ हिंगणघाट यास गुन्हयासंबंधाने विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली यावरूण नमुद आरोपीस सदर गुन्हयात अटक करण्यात आली व सदर आरोपी यांच्याकडुन होंन्डा अॅक्टीचा मोपेड गाडी क एम एच ४९ बीएच ९५४८ किंमती ५०,०००/- व गुन्हयात वापरण्यात आलेली हिरो कंपनीची नंबर नसलेली मोपेड़ कि १०००० जागा राखून २ मोपेड़ कि १,२०,०००/- रू गा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास मापोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधिक्षक रमेश घुमाल उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड व पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांचे मार्गदर्शनाखाली गठीत विशेष पथकातील अधिकारी सपोनी प्रशांत लभाणे, पो हवा आशिष टेकाम, पोहवा युनुस खान पोहवा कुणाल पालदी, पोशि आशिष कछवाह व पोशि माधव गुट्टे यांनी कामगिरी पार पाडली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा आशिष टेकाम पो स्टे बुटीबोरी है करीत आहे.