संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी फाटा जवळ गोंडेगाव कडुन टेकाडी कडे येणाऱ्या रोडवर अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर ला कन्हान पोलीसांनी पकडुन ट्रॅक्टर, ट्राली व एक ब्रास रेती सह एकुण सात लाख पाच हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे कन्हान ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार गुरूवार (दि.१०) नोव्हेंबर ला सकाळी ८:३० ते ९:३० वाजता दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले हे आपल्या स्टाफसह पोस्टे परिसरात दाखल गुन्ह्यातील आरोपीताचा शोध कामी सरकारी वाहनाने फिरत असतांना गुप्त बातमीदारा कडुन खबर मिळाली कि, गोंडेगाव कडुन टेकडीकडे येणाऱ्या रोड वरून एक ट्रॅक्टर च्या सहायाने ट्राॅली मध्ये अवैधरित्या रेतीची चोरी होत आहे. अशा विश्वसनीय मिळालेल्या खबरेवरून कन्हान पोलीस घटनास्थळी पोहचले असता पोलीसांना पाहुन ट्रॅक्टर चालक हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर सोडुन पळुन गेेला ट्रॅक्टरची पाहणी केली असता ट्रॅक्टर चा मुंडा क्रमांक एम एच ३१ ए जी ६१८९ किंमत ४,००,००० रु, ट्रॉली क्रमांक. एम एच ३१ झेड ३९५६ किंमत ३,००,००० रु. व एक बॉस रेती किंमत ५००० रु. असा एकूण ७,०५,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला ट्रॅक्टर मालक आणि चालक यांच्या विरुद्ध कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले हे करीत आरोपीचा शोध घेत आहे.