संदीप कांबळे, कामठी
1 लक्ष 35 हजार 54 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
कामठी ता प्र 7:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ओमनगर रणाळा येथील एका कुलूपबंद घरातून चोरट्यानी अवैधरित्या घरात शिरून घरातील बेडरूमच्या लाकडी आलमारीत सुरक्षित ठेवलेले 2 लक्ष 80 हजार 800 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना 11 व 12 एप्रिल दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी अश्विनी सुरेंद्र पाटील वय 28 वर्षे ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून घटनेची नोंद करीत अज्ञात चोरट्या विरुद्ध कायदेशोर गुन्हा नोंदवून तपासाला दिलेल्या गतीतून तर्कशक्तीच्या आधारावर तसेच सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळलेले आरोपीची खबऱ्या द्वारे ओळख पटवीत सदर घरफोडीचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून यातील आरोपी तीन चोरट्याना अटक करीत त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या एकूण मुद्देमालातून 1 लक्ष 35 हजार 54 रुपये किमतीचे सोन्या चांदोचे दागिने हस्तगत करण्यात आले. अटक तीन आरोपीमध्ये नयागोदाम कामठी रहिवासी 19 वर्षीय मुलगा तसेच दुर्गा सोसायटी येरखेडा रहिवासी 20 वर्षीय विधिसंघर्षीत बालकासह कल्याण ठाणे काटेमानिवाली रहिवासी 28 वर्षीय अतुल सलामे चा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळ रहिवासी फिर्यादी अश्विनी पाटील ह्या खाजगी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले असता , कुलूपबंद घरात घरी कुणी नसल्याची संधी साधून सदर अटक आरोपीने संगनमत करून सदर घराच्या लोखंडी सेफ्टी गेटचे कुलूप तोडून , स्टील ची ग्रील काढून, खिडकीचा काच फोडून अवैधरित्या घरात प्रवेश करून बेडरूम च्या लाकडी आलमारीतील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना फिर्यादी घरी आल्यावर उघडकीस येताच पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून सहाय्यक फौजदार संजय पिल्ले व राजीव टाकळीकर यांच्या खबऱयांनी दिलेल्या माहितीवरून सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीची ओळख पटवीत तिन्ही आरोपीना अटक करण्यात आले.यातील दोन विधिसंघर्षित आरोपी बालकाला सुचनापत्र देऊन सोडण्यात आले.तर तिसरा वयस्क आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.
ही यशस्वी कारवाही डीसीपी चिन्मय पंडित, एसीपी नयन आलूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, सहाय्यक फौजदार संजय पिल्ले, राजीव टाकळीकर , निलेश यादव, संतोषसिंग ठाकूर, अनिल बाळराजे,अनुप अढाऊ, ललित शेंडे, हर्षद वासनिक , कमलाकर पराते यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.