भिवापुर येथील पेट्रोल पंप चालकाच्या हत्येचे रहस्य उलगडले मुलीनेच केला वडीलाचा खून

नागपूर :-दिनांक १७/०५/२०२३ चे सकाळी १०.०० ते १०.३५ वा. दरम्यान भिवापुर ते नागभिड रोड वर असलेले भारत पेट्रोल पंप (पाटील पेट्रोल पंप) चे मालक दिलीप राजेश्वर सोनटक्के रा. दिघोरी नागपूर हे रात्री विक्री झालेल्या ईधनाचे पैशाचा हिशोब करीत आपल्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले होते या दरम्यान एक मोटार सायकलवर आपल्या चेहऱ्यावर दुप्पटा बांधुन तिन इसम पेट्रोल पंपावर आले आपली गाडी पेट्रोल पंपाच्या कार्यालय समोर उभी करुन कार्यालयात पुसुन त्यातील एक ईसमाने दिलीप राजेश्वर सोनटक्के यांना चाकुने सपासप पोटावर वार करण्यात सुरुवात केली व त्यामधील एक इसमाने हातात बंदुक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तेथील उपस्थित असलेल्या कर्मचारी यांना तुम सब लोग यहां से भाग जावो अशी धमकी दिली व एक तेथील कर्मचारी राजेश्वर नान्हे यांना जखमी केले त्यामुळे तेथील इतर कर्मचारी वर्ग घाबरुन कार्यालयाचे बाहेर निघुन गेला. थोडया वेळात हल्ला करणारे तिथेही आपल्या मोटार सायकलने उमरेडच्या दिशेने निघुन गेले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयातचे आत जावून पाहीले असता त्यांचे मालक दिलीप राजेश्वर सोनटक्के वय ६० वर्ष रा. दिघोरी नागपूर हे गंभीर जखमी अवस्थेत दिसून आले तसेच हिशोब करण्यात आलेले नगदी रुपये १,३४,०००/- रक्कम कॉऊंटरवर दिसून आले नाही. हाल्ला करण्यात आलेले इसम हे आपल्या चेहऱ्यावर दुप्पटा बांधून असल्याने त्यांना कोणीही ओळखून शकले नाही. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन भिवापुर येथे अप क्रमांक २९३ / २०२३ कलम ३०२, ३९४ ३९७ ३४ भादवि सहकलम ३,२५ भाहका दाखल करण्यात आला. परंतु पेट्रोलपंप मालकाच्या खुनाचे रहस्य अजूनही उलगडलेले नव्हते. घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने सदरचा खुन हा पैशासाठी जबरी चोरी नसुन सुपारी देवुन खुन केला आहे अशी शंका असल्याने त्याचा सखोल तपास करण्यास पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद यांनी दिलेल्या आदेशावरून सखोल तपास करण्यास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण तसेच पोलीस स्टेशन भिवापूर यांना सक्त आदेश दिले. गुन्हयाचे मुळ कारण शोधुन काढण्याबाबत पथकाने अथक प्रयत्न केला असता मृतकाची मुलगी प्रिया हिच्यावर संशय असल्याने तिची सखोल ०२ दिवस चौकशी केली असता तिने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली. मृतक हा दारू पिण्याच्या सवयीचा असून मृतकाचे बाहेर महिलेशी अनैतिक संबंध होते. तो नेहमी पत्नीला व मुलीला शारीरीक व मानसिक त्रास देत होता. मुलगी आणि पत्नी त्याचेकडून होणारी घरगुती हिंसेने त्रस्त झाल्या होत्या. वडीलांकडून होणारा शारीरीक व मानसिक त्रास सहन होत नव्हता या त्रासाला कंटाळून मुलगी नामे– प्रिया किशोर माहुरतळे (सोनटक्के) वय ३५ वर्ष रा. भास्कर वाडेकर यांच्या घराजवळ सर्वेश नगर नागपूर हिने वैतागुन या गुन्हयातील मुख्य आरोपी शेख अफरोज उर्फ इमरान मौलाना शेख हनीफ वय ३३ वर्ष रा. रामचंद्र बाब मठाचे मागे मोठा ताजबाग नागपूर यांचेशी संपर्क करून ४ ते ५ लाख रूपये देवून वडीलाचा खुन करण्याची सुपारी दिली. खुन केल्यानंतर पैसे दिले जातील असे सांगितले. पेट्रोलपंप, घर, दागिने, शेती ही मृतकाच्या नावे होती आणि मृतकाच्या  मृत्युनंतर ती संपत्ती मुलीला व पत्नीला भेटेल या अपेक्षेने तसेच वडीलाच्या रोजच्या त्रासाला कंटाळुन आरोपी शेख अफरोज उर्फ इमरान मौलाना शेख हनीफ वय ३३ वर्ष रा. रामचंद्र बाब मठाचे मागे मोठा ताजबाग नागपूर यांचे मार्फतीने हा गुन्हा घडवुन आणला. एकंदरीत घरगुती हिंसाचाराला कंटाळुन आरोपी प्रिया हिने वडीलाच्या खुनाचा कट रचुन नियोजनबद्ध पद्धतीने योजना आखून हा खुन घडवुन आणला असे तपासात निष्पन्न झाले. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस स्टेशन भिवापूर येथील ठाणेदार जयपालसिंग गिरासे, सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, इतर पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

@ फाईल फोटो

NewsToday24x7

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

Wed May 24 , 2023
खापरखेडा :- अंतर्गत ०८ किमी अंतरावर किल्ले कोलार अंतरावरील मौजा नांदा कोराडी शिवार कामठी येथे दिनांक २२/०५/२०२३ से सायंकाळी ०६.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे श्रृष्टी महेंद्रकुमार बावणे वय २४ वर्ष, रा. प्लॉट नं. ५३ गोरखनाथ को ऑपरेटीव्ह हायसिंग सोसायटी बाबा फरीद नगर, गायत्री नगर एनआयटी गार्डन जवळ कोराडी रोड नागपूर ही तिचा मित्र नामे- प्रविण बोंडे रा. बेझनबाग याचे सोबत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com