एका आरोपीला केली अटक ; मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात करत होते विक्री
अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – राज्य सभा सदस्य खा. प्रफुल पटेल यांच्या गोंदियातील सी जे कंपनीच्या नावाने डुप्लिकेट बिडी तयार करणाऱ्या कारखान्यावर. पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक ककेली आहे. डुप्लिकेट बिडी तयार करण्यासाठी वापरला जाणारा साहित्य देखील मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे.
खा. प्रफुल पटेल यांच्या वडिलाणाच्या नावाने सी जे कंपनीने मनोहर बिडी बाजारात चलनात आणली असून. त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी देखील असल्याने याच नावाचा फायदा घेत. गोंदिया जिल्याच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली गावातील सुनील बोरकर ह्या इसमाने बिर्शी गावात एक भाड्याची खोली घेत. या ठिकाणी मनोहर फोटो बिडी, २७ नंबर स्पेशल बिडी, मंकी बॉय बिडी या सारख्या नामंकित ब्र्यांड चे बनावट स्टिकर तयार करून. गावात महिलांकडून डुप्लिकेट बिडी तयार तयार करून घेत. याच बिड्यांवर हे बनावट स्टिकर लावत डुप्लिकेट बिडी विक्री करीत असल्याची माहिती. गोंदियातील सी जे कंपनीचे म्यानेजर मुकेश पटेल यांना माहिती मिळताच. मुकेश पटेल यांनी आमगाव पोलिसांची मदत घेत. बिर्शी गावातील कारखान्यावर धाड टाकत एका आरोपी शह डुप्लिकेट बिडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार साहित्य देखील जप्त केला आहे. तर हे डुप्लिकेट बिडी महाराष्ट्र सह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येते विक्री करत असत तर या मध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता असल्याचे सी जे कंपनीचे म्यानेजर मुकेश पटेल यांनी म्हटले आहे. तर आमगाव पोलिश याचा तपास करीत आहेत.
BYTE :- मुकेश पटेल (सी जे कंपनी मॅनेजर गोंदिया)
BYTE :- युवराज हांडे पोलिश (निरीक्षक आमगाव पोलिश ठाणे)