घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :-पोलीस ठाणे कोराडी हद्दीत, साक्षी प्रतिक्षा अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, प्रेम नगर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी आशा रायभान गजभिये, वय ४२ वर्षे, हया ईरा हॉस्पीटल लकडगंज, नागपूर येथे नोकरीवर असुन त्या आपले घराला कुलुप लावुन हॉस्पीटलला डयुटीवर गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून, घरातील बेडरूम मधील लाकडी आलमारीतुन सोन्याचे दागिने, व रोख ६५,०००/- रू असा एकुण अंदाजे १,६१,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कोराडी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४५४, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा, युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक तपास करून, आरोपी नामे रोशन सेवकदास मेश्राम, वय ४१ वर्षे, रा. भिमटेकडी, आयबीएम रोड, गिट्टीखदान, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्याने वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील सोन्याचे दागिने, रोख ८,०००/- रू व गुन्हयात वापरलेले वाहन सिटी १०० मोटरसायकल असा एकूण किंमती अंदाजे २,२७,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई करीता कोराडी पोलीसांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, पोनि. मुकुंद ठाकरे, पोउपनि, मधुकर काठोके, सफी, सतिश पांडे, दशरथ मिश्रा, पोहवा. विजय श्रीवास, संतोषसिंग ठाकुर, पोअं, जितेश रेड्डी, दिपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार व दिपक लाकडे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

Sun Mar 17 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत, प्लॉट नं. ९. मोहित नगर, बहादुरा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी दिनेश मोरेश्वर महल्ले वय ४० वर्षे यांनी त्यांची अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ ए.जी २८३० किती अंदाजे ३०,०००/- रू ची आपले घरासमोर लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची नमुद अॅक्टीव्हा गाडी चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights