नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत, प्लॉट नं. ९. मोहित नगर, बहादुरा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी दिनेश मोरेश्वर महल्ले वय ४० वर्षे यांनी त्यांची अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ ए.जी २८३० किती अंदाजे ३०,०००/- रू ची आपले घरासमोर लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची नमुद अॅक्टीव्हा गाडी चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा, युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक तपास करून, आरोपी नामे १) सैय्यद रोशन सैय्यद रमजान, वय २७ वर्षे, रा. मोठा ताजबाग, सिंधीचन, नागपूर २) मोहम्मद अरशद मोहम्मद अजगर वय ३४ वर्ष रा. यासीन प्लॉट, मोठा ताजबाग, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्यांनी वर नमूद गुन्हा पाहिजे आरोपी क. ३) जाबाज उर्फ सलमान शेख वय ३० वर्ष रा. आजाद कॉलोनी, झोपडपट्टी, ताजबाग, नागपूर याचेसह संगणमत करून केल्याची कबुली दिली, आरोपींचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेले अॅक्टीव्हा गाडी किंमती अंदाजे ३०,०००/- रू. ची जप्त करण्यात आली. आरोपी क. १ व २ यांना व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करीता सक्करदरा पोलीसांने ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, पोउपनि, वैभव वारंगे, पोहवा. युवानंद, सतिश, निलेश, नापोअं, अजय, चेतन यांनी केली.