नागपूर :- अंत्योदयाचे प्रणेते, शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडून त्यास भारतीय समाजापुढे ठेवणा-या पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या विद्युत भवन या प्रशासकीय कार्यालयात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, प्रभारी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रदिप सातपुते, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने यांचेसह अभियंते, अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर