घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक 

नागपूर :- दि. ०७.०८.२०२३ चे ०६.०० वा. चे दरम्यान पो. ठाणे एम. आय.डी.सी हदीत महाराष्ट्र चौक, महाजन वाडी, वानाडोंगरी, नागपुर येथे फिर्यादी ब्रिजेशकुमार छबीलाल झारीया वय २६ वर्ष, यांचे घराचे काम सुरू असून ते तेथेच एका तात्पुरत्या खोलीत राहतात. घटनेवेळी फिर्यादी हे झोपले असता अज्ञात चोरट्याने खोलीचे दार उघडुन फिर्यादीचा विवो कंपनीचा मोबाईल किमती १०,०००/- रू व वरचे माळ्यावरील लोखंडी तराफे किमती ५,०००/- रु. असा एकूण किंमती अ. १५,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.

फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून एम.आय.डी.सी पोलीसांनी पो. ठाणे हद्दीत शोध घेवून आरोपी अल्सद वल्द जलालुद्दीन मुस्काशाह वय २० वर्ष रा. राजिव नगर, राधाकृष्ण मंदींर जवळ, एम.आय.डी.सी. याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. आरोपीने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे आणून फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोउपनि जाधव यांनी आरोपी विरुद्ध कलम ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोरवाल महाविद्यालयमध्ये पंचप्राण प्रतिज्ञा शपथ कार्यक्रम संपन्न.

Wed Aug 9 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- एस.के. पोरवाल महाविद्यालय, कामठी येथे  दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी10.00 वाजता मेरी माटी मेरा देश  या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत पंचप्राण प्रतिज्ञा शपथ कार्यक्रम घेण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे यांनी केले. तर ही शपथ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विनय चव्हाण यांनी दिली. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com