साठ दिवसात 31 मुलांना मिळाले पालक
लोहमार्ग पोलिसांची सतर्कता
नागपूर :- पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन बंटी बबलीला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना बाल गृहात ठेवण्यात आले आहे. मुलीचे पालक आल्यावर त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. तसेच कर्तव्यदक्ष लोहमार्ग पोलिसांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिण्यात घरून पळालेल्या 31 मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील अल्पवनीय मुलगा मुंबईत कामाला आहे. गेल्या दोन वर्षापासून एकाच ठीकाणी असल्याने जवळच राहणार्या मुलीशी त्याची मैत्री झाली. दोघांनीही पळून जाण्याची योजना आखली. ठरल्यानुसार दोघेही रेल्वेने निघाले आणि नागपूर रेल्वे स्थानकावर उतरले. येथून दुसर्या गाडीने निघनार होते. दरम्यान कर्तव्यावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांचे लक्ष अल्पवयीन मुलांवर गेले. संशय बळावल्याने त्यांची विचारपूस केली. सारा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी त्यांना ठाण्यात आणून सखोल चौकशी केली. तसेच रेल्वे चाईल लाईनच्या मदतीने दोघांनाही शासकीय बाल गृहात ठेवण्यात आले आहे. लवकरच मुलीचे पालक येतील.
मनात राग धरून काही मुले घर सोडतात आणि दुसर्या शहरात किंवा परप्रांतात जातात. ही संधी साधून समाजविघातक कृत्य करणारे अशा मुलांना हेरून वामर्मागाला लावतात. मात्र, सतर्क लोहमार्ग पोलिसांनी घर सोडलेल्या 31 मुलांना त्यांच्या पालकांची भेट घडविली.
अल्पवयीन मुलांना चांगल्या वाईटाची समज नसते. हा केवळ त्यांच्या वयाचा दोष असतो. अनुभवाची कमतरता असते. त्यामुळे कितीही चांगला सल्ला दिला तरी पालक विलन ठरतो, त्यामुळे मुले घर सोडतात. अशी मुले रेल्वे स्थानक, बस स्थानकावर भटकत असतात. रेल्वे चाईल्ड लाईन प्रतिनिधी अशा मुलांची आस्थेनी विचारपूस करून त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या माध्यमातून बाल कल्याण समितीपुढे हजर करतात. यासाठी लोहमार्ग पोलिसांची मदत असते. बरेचदा कर्तव्यावर असलेले लोहमार्ग पोलिसही अल्पवयीन मुलांना आणतात.
नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यावर अल्पवयीन प्रेमी युगुलांना ताब्यात घेवून त्यांच्या पालकांशी संपर्क साधतात. पालक आल्यावर खात्री करून मुलांना त्यांच्या ताब्यात दिले जाते. लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी संप्टेबर आणि ऑक्टोबर या दोन महिण्याच्या कालावधीत 31 मुलांना शोधून त्यांच्या पालकाच्या ताब्यात दिले. यात 13 मुले आणि 18 मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील पाच प्रकरणात 363 च्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. ही कामगिरी लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या मार्गदर्शनात पोलिस शिपाई नाजनीन पठाण यांनी केली.