राज ठाकरेंना अयोध्येत रोखणारे ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार? राज्यात आता नवा कुस्ती सामना!

पुणे :- राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसात महाराष्ट्रत येणार आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष विरुद्ध खासदार ब्रिजभूषण सिंह असा वेगळाच सामना आता रंगणार आहे. ब्रिजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. येत्या 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान राज्यात महाराष्ट्र केसरी  कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धा पुण्यात होतील. मात्र कुस्तीच्या या स्पर्धांवरून आता राजकारण तापण्याची चिन्ह आहेत.
मे 2022 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आयोजित केला होता. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात जे आंदोलन केलं होतं, त्यासाठी आधी समस्त उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागा, अशी भूमिका उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती.

राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशात आले तर ते सहि सलामत परतू शकणार नाहीत, असे आव्हान ब्रिजभूषण सिंह यांनी दिलं होतं. एकिकडे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरु असताना ब्रिजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशात राज ठाकरेंना दिलेल्या आव्हानाची तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती. ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून वारंवार दिली जाणारी आव्हानं पाहून राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता. मात्र आता महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेला ब्रिजभूषण सिंह येणार आहेत. त्यामुळे मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ या स्पर्धेचं आयोजन करत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमृता फडणवीस यांनी पोलीस सुरक्षा नाकारली, फडणवीसांवर विश्वास दाखवत म्हणाल्या…

Wed Nov 2 , 2022
मुंबई : अमृता फडणवीस यांना देण्यात आलेली पोलीस सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. पोलीस सुरक्षा नाकारताना त्यांनी सर्व सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com