“देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी देणार होते, पण एकनाथ शिंदे..”,रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

मुंबई :- महायुतीने रिपब्लिकन पक्षाला दोन जागा दिल्या पाहिजेत अशी मागणी करणारे रामदास आठवले यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. महायुतीच्या जागावाटपाचं चित्र बरंच स्पष्ट झालं आहे. अशात मनसेला बरोबर घेणार का? हा प्रश्न आहे. हे सगळं असतानाच रामदास आठवलेंनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

“मला शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीतून लढलो होतो. त्यावेळी माझा पराभव झाला होता. या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी द्यायला तयार होते. इतकंच नाही तर फडणवीस यांनी मला शिर्डीची जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण असल्याने मला उमेदवारी मिळाली नाही.” असा गौप्यस्फोट रामदास आठवलेंनी केला आहे.

यानंतर रामदास आठवले म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला किमान एक जागा मिळावी असा आमचा आग्रह होता. पण तसं घडलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिलं आहे की २०२६ चा माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर रिपाईबद्दल विचार केला जाईल. केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद रिपाईला मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करणार आहेत. तसंच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हाही रिपाईला पद दिलं जाईल. महामंडळाची दोन चेअरमन पदं आणि जिल्हा कमिटीमध्ये रिपाईला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस आयुक्त नागपुर शहर यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे निरोप समारंभ

Mon Apr 1 , 2024
नागपूर :- पोलीस आयुक्त नागपुर शहर हे आज दिनांक ३१.०३.२०२४ चे १२.०० वा, नागपुर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित पोलीस भवन येथील ऑडीटोरीयम हॉल येथे सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे निरोप समारंभ कार्यक्रमाकरीता स्वतः आवर्जुन उपस्थित राहीले, सेवानिवृत्त होणारे १४ अधिकारी आणि अंमलदार यांना सह पत्नी परीवारासह पोलीस आयुक्त यांनी भावपुर्ण निरोप दिला. याक्षणी पोलीस आयुक्त यांनी सर्व सेवानिवृत्त होणारे अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com