गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यु

संदीप कांबळे, कामठी

-आत्महत्या की हत्या

-घटनेचे रहस्य अजूनही गुलदस्त्यात
-शविच्छेदन अहवालातून उघड होईल घटनेचे रहस्य
कामठी ता प्र 17 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खुशबू मोटर्स च्या मागे न्यू येरखेडा येथे एका गर्भवती महिलेची आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली असून मृतक महिलेचे नाव सोनम अभिषेकसिंग राजपूत वय 23 वर्षे रा सागरीकर भीमटे यांच्या घरची भाड्याची खोली न्यू येरखेडा कामठी असे आहे.मात्र ही आत्महत्या नसून हत्या केल्याचा आरोप मृतक महिलेच्या माहेरच्या कुटुंबियांकडून होत आहे.तेव्हा या घटनेचे रहस्य अजूनही गुलदस्त्यात असून ही हत्या की आत्महत्या या प्रकरणाचे रहस्य शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिला ही सदर घटनास्थळी पती सोबत मागील एक वर्षपासून भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे.काल घरी कुणी नसल्याची संधी साधून सदर मृतक महिलेने घरातील बेडरूम खोलीच्या सिलिंग फॅन ला काळ्या ओळणी ने गळफास केल्याची घटना काल सायंकाळी साडे पाच च्या सुमारास घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी पिल्ले व राजू यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी कामठी च्या शासकोय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवगार गृहात हलविण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी ही घटना आत्महत्येची नसून हत्याची असल्याचा आरोप मृतक महिलेचे कुटुंबीय सदस्य करीत आहेत. तसेच मृतकेला गर्भपात करण्यासाठी पतीकडून दबाव घालण्यात येत असल्याचे सांगण्यात आले तर या प्रकरणाचे खरे रहस्य हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणार आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com