नागपूर :-शुक्रवारी दि. ७ जुलै २०२३ रोजी भाजपा पश्चिम नागपूर विधी आघाडीची घोषणा करण्यात आली. विधी आघाडी चे कार्य प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वाढविण्याकरीता मंडळ स्तरावर विधी आघाडी स्थापन करण्याचे निर्देश विधी आघाडी नागपूर शहर अध्यक्ष ऍड. परीक्षेत मोहिते यांनी दिले, त्या अनुषंगाने पश्चिम नागपूर विधी आघाडीचे अध्यक्ष ऍड. स्वप्निल चांदुरकर यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी अध्यक्ष ऍड. स्वप्निल चांदुरकर यांनी ४० वकिलांना विविध पद देऊन नियुक्ती पत्र बहाल केले त्यामध्ये ऍड. अर्जुन टेकाडे, ऍड. देवेंद्र महाजन, ऍड. श्याम जयस्वाल, ऍड. अमित सिंग यांना महामंत्री, ऍड. प्रबोध भुसारी यांना संपर्क प्रमुख, ऍड. विक्रम त्रिवेदी यांना प्रसिद्धी प्रमुख व अन्य लोकांना नियुक्त करण्यात आले व १५० लोकांच्या उपस्थितीत समक्ष कार्यकारिणीची घोषणा केली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक संजय बंगाले उपस्थित होते व त्याच प्रमाणे माजी आमदार गिरीश व्यास, , रामभाऊ आंबुलकर महामंत्री नागपूर शहर, पश्चिम नागपूरचे अध्यक्ष विनोद कन्हेरे, माजी प्रदेश सचिव ऍड. उदय डबले, शहर अध्यक्ष ऍड. परिक्षीत मोहिते, शहर उपाध्यक्ष ऍड. कांचन करमरकर, शहर उपाध्यक्ष ऍड प्रफुल्ल मोहगावकर, ऍड. नितीन तेलगोटे, ऍड. प्रकाश जैसवाल, प्रामुख्याने हजर होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सतीश वडे, विनय कडू, सुधीर कपूर, ऍड. सारंग देव, एड. प्रफुल्ल मोहगावकर,ऍड. स्वप्नील डुबेवार, ऍड गिरीश खोरगडे, ऍड विश्वनाथ राठोड,ऍड. नचिकेत व्यास, शहर विधी आघाडी महामंत्री ऍड. अमोल कावरे, ऍड. संकेत यादव, ऍड. अमोल बोरकर, ऍड. रितेश कालरा हे उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये माजी आमदार गिरीश व्यास, ऍड. उदय डबले व ऍड.परिक्षीत मोहिते, ऍड. नितीन तेलगोटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ऍड. स्वप्निल चांदुरकर यांनी मांडली. त्यानी पश्चिम नागपूर मध्ये भविष्यात विधी मार्गदर्शन केंद्र उघडून जनते मध्ये कायदेबाबत शिक्षण व मार्गदर्शन करून जनतेची सेवा करण्याचे आश्वासन दिले. या केंद्रामध्ये गरीब असहाय जनतेस मोफत कायदे विषयक सल्ला, मार्गदर्शन व शिक्षण देऊन न्यायालयात वाढत चाललेल्या कोर्ट केसेसला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल. असा उद्देश्य व्यक्त केला.
कार्यक्रमाचे मंच संचालन ऍड.अर्जुन टेकाडे व ऍड. देवेंद्र महाजन यांनी केले व आभार प्रदर्शन ऍड. श्याम जैस्वाल यांनी केले.