नागपूरच्या विकासात डॉक्टरांचे मोठे योगदान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने मेळावा

नागपूर :- नागपूर शहरात आरोग्याच्या उत्तम सुविधा असाव्यात, गरिबांना सर्व प्रकारचे उपचार मिळावे यासाठी सर्वांनीच सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मेडिकलच्या जागाही वाढल्या आहेत. जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा नागपुरात उपलब्ध आहेत. शिवाय अनेक मोठे हॉस्पिटल्स झाल्यामुळे बाहेरच्या राज्यांमधील रुग्णही इथे उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. नागपूर शहराच्या विकासात येथील डॉक्टरांचेही मोठे योगदान राहिलेले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) येथे केले.

भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, प्रसिद्ध अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी, भाजप नेते संजय भेंडे, डॉ. उपेंद्र कोठेकर, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. गिरीश चरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागपूर शहरातील डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ना.  गडकरी म्हणाले, ‘गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपली साथ मिळाली, मी खासदार झालो आणि मंत्रीही झालो. त्यामुळे नागपूरसह देशभरात अनेक चांगली कामे करता आली. पण तुम्ही निवडून दिले नसते तर ही कामे करता आली नसती. माझ्या कामामध्ये तुमचाही सिंहाचा वाटा आहे.’ सूत्रसंचालन अभिजित मुळे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर तथा रामटेक लोकसभा चुनाव 2024 को पूरे दमखमके साथ AIMIM लड़ने को मैदान में 

Fri Mar 22 , 2024
नागपुर :- जिला प्रभारी निसर अहमद सिद्दीकी से मुलाकात के बाद जनकारी मिली है की , आगामी 2024 लोकसभा चुनाव AIMIM नागपुर तथा रामटेक लोकसभा के लिए पार्टी के वरिष्ठ पाध्दिकारिओ तथा नेताओं के साथ विचार विमर्श करके तय किया गया है की दलित और मुस्लिम समुदाय के इच्छुक उम्मीदवारों को देखकर पार्टी के पदाधिकरीयो का कहना है की पिछली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com