जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

नागपूर :- दिनांक ०७.०५.२०२३ चे २३.४० वा चे सुमारास पो.ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत, आयसी चौक जवळील, कंपनी समोरील आनमधील रोड येथे फिर्यादी शिवम संजय बावणे वय २३ वर्ष रा. महाजनवाडी, प्लॉट न. १७२. वानाडोंगरी हा त्याचे दुचाकी वाहनावर मोबाईल फोनवर बोलत बसलेला असतांना दोन आरोपींनी फिर्यादी जवळ येवुन संगणमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून हातबुक्कीने मारहाण केली. व आरोपांनी फिर्यादीचा मोबाईल, हेडफोन, गळयातील चांदीची चैन, व मोपेड गाडी क. एम.एच ४० एस. आर. ७५४८ जबरीने हिसकावुन घेवुन पळून गेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे एम.आय.डी.सी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३९४ ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला.

तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तांत्रीक तपास तसेच मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन गुन्हयातील आरोपी १) श्याम उर्फ पाधा राममूर्ती शर्मा, वय २४ वर्ष, रा. इंदोरा माता नगर, पो. ठाणे एम. आय. डी.सी. २) सोमेश उर्फ दद्या रविन्द्र घवराळे, वय २० वर्ष, रा. वैशाली नगर, दुर्गा मंदी जवळ पो. ठाणे एम.आय.डी.सी. नागपुर यांना ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. आरोपीचे ताब्यातुन मोपेड गाडी मोबाईल हेडफोन व चैन असा एकुण १६,५००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वरील कामगिरी  अनुराज जैन, पोलीस उप आयुक्त परि. क. १. प्रविण तेजाळे, सपौआ एम.आय.डी.सीयांचे मार्गदर्शनाखाली पोनि नरके, पोनि कवाडे, पोउपनि जाधव, पोहवा अरविंद घिये, पोनाअ दिपक सराटे,स्माईल नोरंगाबादे, जितेन्द्र खरपुराया, निलेश दुबे यांनी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com