संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-नगराध्यक्ष पदाकरिता इच्छुक उमेदवारांची आरक्षण सोडतीनंतरच दावेदारी
कामठी ता प्र 25 :- आगामी होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणुका तोंडावर असून ओबीसी आरक्षण लागू झाल्याने 28 जुलै ला आरक्षण सोडत निघणार आहे यामध्ये ओबीसी नगरसेवकांच्या आरक्षण च्या जागा निश्चित होणार आहे त्यानंतर मुंबई हुन नगराध्यक्षचे आरक्षण जाहीर होणार आहे.नगरसेवकातुन नगराध्यक्ष निवडीला ब्रेक लागला असून थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार आहे.जनतेतून निवडुन येण्यासाठी अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार इच्छुक आहेत परंतु जो पर्यंत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येत नाही तोपर्यंत नगराध्यक्ष पदाचे दावेदार पुढे येऊन दावेदारी न करण्याचा पवित्रा घेतला आहे.
कामठी नगर परिषद चा 2017 ते 2022 पर्यंतचा पंचवार्षिक कार्यकाळातील नगराध्यक्ष पदाची निवड ही थेट जनतेतून करण्यात आली होती ज्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे कांग्रेस चे उमेदवार मो शाहजहा शफाअत यांनी भाजप-बरीएम युतीचे उमेदवार अजय कदम यांचा 2369 मतांनी पराभव झाला होता तसेच द्विसदस्यीय 16 प्रभाग मिळून 32 नगरसेवक निवडून आले होते .ज्यामध्ये कांग्रेस 16, भाजप 8, बरीएम 2, बसपा 1 , शिवसेना 1 व अपक्ष 4 निवडून आले होते.यावर्षीच्या होणाऱ्या 2022 ते 2027 या पंचवार्षिक कालावधीत द्विसदस्यीय पद्धत कायम असून एक प्रभागात वाढ झाल्याने 16 ऐवजी 17 प्रभाग तर 34 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत तर नगराध्यक्ष हे पुनःश्च थेट जनतेतून निवडून द्यायचे असून सलग दुसऱ्या पंचवार्षिक ला नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होण्याची पुनरावृत्ती होणार आहे.यासाठी शहरातील इच्छुक राजकीय पुढाऱ्यांनी आतापासूनच कंबर कसली आहे.कामठी नगराध्यक्ष पदासाठी भाजप चा उमेदवार आतापर्यंत विराजमान होऊ न शकल्याची खंत व्यक्त करीत जाहीर होणारे आरक्षण सर्वसाधारण वा ओबीसी झाल्यास भाजप कडून राजकीय चाणक्य म्हणून ओळख असलेले भाजप कडून अज्जू अग्रवाल यांचे नाव पुढे येत आहे तर बरीएम कडून मागच्या निवडणुकीत हलक्याश्या मताने पराभूत झालेले अजय कदम यांचे नाव चर्चेत आहे.तर कांग्रेस मधून मो शाहजहा शफाअत,काशिनाथ प्रधान,शकुर नागाणी, गुड्डू मानवटकर, नीरज यादव, तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून दिनेश पाटील यांच्याही नावाच्या चर्चेला जोम आहे.मात्र मागील 20 वर्षांपासून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जाहीर न झाल्याने यावर्षी एस सी आरक्षण निघणार असा विश्वास तर्क लावण्यात येत आहे तर नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती आरक्षण जाहीर झाल्यास भाजपकडून उज्वल रायबोले यासह इतरही नावे चर्चेत आहेत तर कांग्रेस कडून नीरज लोणारे, वैशाली मानवटकर,प्रमोद उर्फ गुड्डू मांनवटकर,आदी नावे चर्चेत आहेत तसेच बरीएम कडून दीपंकर गणवीर, सिद्धार्थ रंगारी, आदी तर वंचित बहुजन आघाडी कडून प्रमोद उर्फ दादा कांबळे ह्या नावाच्या चर्चेला उधाण आहे.
कामठी नगर परिषद चे नगराध्यक्षपदी कामठी शहरातून रमाकांत लोहिया, नारायण हरी कुंभारे, एच एम कुददुस,ऍड सुलेखाताई कुंभारे,अंकुश बावनकुळे,गुड्डू मानवटकर,मायाताई चवरे, शकुर नागाणी,नीरज यादव,रुबिना शेख , मो शाहजहा शफाअत यातील नगराध्यक्ष पद भूषविलेले लोकप्रतिनिधी देहावसान सुद्धा झाले आहेत.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय निघेल यावर तर्क वितर्क लावायला सुरुवात झाली आहे.तर निवडणुका लांबणीवर गेल्यास नगर परिषद च्या प्रशासकाला आणखी मुदतवाढ मिळणार आहे.