संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलिस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १० कि मी अंतरावरील केरडी येथील योगेंद्र भोयर यांचे घरासामोर अंगणातुन हिरो स्प्लेंडर प्रो दुचाकी अज्ञात इसमाने चोरी केल्याच्या तक्रारी वरून कन्हान पोलिसानी चोरीचा गुन्हा नोद करून पुढील तपास करित आरोपी चा शोध शुरू केला आहे.
शनिवार (दि.२३) सप्टेंबर ला रात्री १० वाजता सुमारास योगेन्द्र भाऊराव भोयर वय ३७ वर्ष रा. वार्ड क्र दोन केरडी हे आपल्या शेतातुन दुचाकी वाहन जुनी हिरो स्प्लेंडर प्रो क्र. एम एच ४० एजे २२०७ चेवीस नं.एमबीएलएचए १०ए३डीएचएम ३६९३९, इंजि. नं. एचआईओइएलडीएचएम६९१८० किंमत ३०,००० रुपये ने घरी आले आणि घराचे सामोर अंगणात दुचा की वाहन उभी करून घरात जेवन करून आराम करत होते. रविवार (दि.२४) सप्टेंबर ला रात्री अंदाजे २ वाजता गावातील निखिल हिवसे याने मोबाईल फोन करुन सांगितले की, आपल्या गावात चोर येत आहेत. तु बाहेर ये म्हटल्याने घराचे बाहेर आलो. तेव्हा निखिल हिवसे आणि अनिकेत खंडार हे माझ्या जवळ आले. आणि तेवढ्यातच गावातील सरपंच आणि मोहल्यातील चार पाच लोक जमा झाले. नंतर सरपंचानी साटक गाव चे वाडीभस्मे यांना सांगितले की, आमच्या गावाकडुन काही ईसम तुमच्या गावाकडे येत आहेत. ते चोरासारखे दिसत आहेत. यावरून वाडीभस्मे यांनी म्हटले की, आम्ही इकडुन येत आहो, तुम्ही तिकडुन तयार रहा. तेव्हा योगेंद्र भोयर दुचाकी घेण्यास घरी आंगनात गेले तर उभी केलेली दुचाकी न दिसल्याने, लक्षात आले की कोणीतरी अज्ञात इसमाने घरा सामोर अंगणात उभी ठेवलेली हिरो स्प्लेंडर प्रो दुचाकी किमत ३०००० रूपयाचा मुद्देमाल चोरी करून नेल्याने (दि. ३०) सप्टेंबर पर्यंत गावात, शेजारी गावात व परिसरात दुचाकी चा शोध घेतला परंतु दुचाकी मिळुन न आल्याने रविवार (दि.१) सप्टेंबर ला कन्हान पोस्टे ला फिर्या दी योगेंद्र भोयर यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी पोलीस निरिक्षक सार्थक नेहते यांचे मार्गदर्शनात पो स्टे ला अप क्र. ६३९/२३ कलम ३७९ अन्वये गुन्हा नोद करून पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.