चरणसिंह, नरसिंह राव, स्वामिनाथन यांना भारतरत्न

-वर्षात तिघांना देण्याचा नियम, यंदा 5 जणांना सर्वोच्च नागरी सन्मान

दिल्ली :- देशासाठी योगदान देणाऱ्या आणखी तीन भूमिपुत्रांना भारतरत्न देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यात देशाच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्यासह देशाची माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या दिवंगत चौधरी चरणसिंह यांचा समावेश आहे. देशातील या 3 भूमिपुत्रांना भारतरत्न देण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवरून जाहीर केले. नुकताच हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. अडवाणी वगळता इतर चारही व्यक्तिमत्त्वांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेचे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वागत केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट, या भागांत ‘यलो अलर्ट’

Sat Feb 10 , 2024
नागपूर :- राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. सरासरी न गाठता यंदा मॉन्सूनने निरोप घेतला. त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. यंदा खरीपचे उत्पादन कमी झाले. तसेच रब्बीची लागवड कमी झाली. कारण राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये जलसाठा नव्हता. यामुळे रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन दरवर्षीप्रमाणे सोडता आले नाही. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा कमी असल्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पाण्याचा वापर करावा लागणार आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com